Metro Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि उडी मारली; पुढे जे झालं ते पाहून...

Viral Video: मेट्रोतील या व्हिडीयोमध्ये एक व्यक्ती चालत्या मेट्रोचा दरवाजा उघडून त्यातून उडी मारताना दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Video Viral : सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरत नाही तर काही व्हिडीओ पाहून चीड येते. असा एक मेट्रोमधील व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही म्हणाल कर्माचं फळ मिळालं.

मेट्रोतील या व्हिडीयोमध्ये एक व्यक्ती चालत्या मेट्रोचा दरवाजा उघडून त्यातून उडी मारताना दिसत आहे. सहसा मेट्रो सुरु असताना दरवाजे बंदच राहतात. जे रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतरच उघडतात. त्यानंतरच प्रवासी मेट्रोमध्ये चढू आणि उतरू शकतात.

सध्या समोर आलेला व्हिडिओ न्यूयॉर्कमधील मेट्रोचा आहे. जिथे मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यापूर्वी मेट्रोचे दरवाजे उघडले आणि खाली उतरण्यासाठी उडी मारली. मात्र धावत्या मेट्रोतून उडी मारल्याने हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर तोंडावर आपटला आहे. (Viral News)

मेट्रोतील प्रवासी जोरजोरात ओरडून या व्यक्तीला दरवाजा उघडू नको असं सांगत होते. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेला हा व्यक्ती कुणाचंही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. हा व्हिडीओ Out of Context Human Race या ट्वीटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. 17 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. (Latest News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT