VIDEO VIRAL Saam TV
व्हायरल न्यूज

VIDEO VIRAL: तो Zooमध्ये गेला अन् समोर अचानक सिंह येऊन उभा राहिला; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Viral Video: सर्वजण आपल्याकडे असलेल्या जीपमधून तेथे फिरत असतात. मात्र यातला एक तरुण गाडीतून खाली उतरतो आणि समोर जातो. त्यावेळी येथे एक सिंह त्याच्यासमोर येऊन उभा राहतो.

Ruchika Jadhav

Video:

जंगलाचा राजा म्हणून सिंहाला ओळखलं जातं. सिंहाचा रुबाब काही वेगळाच असतो. जंगलातला प्रत्येक प्राणी आणि माणसं देखील सिंहाला घाबरतात. कारण मादी सिंह या सर्वांची शिकार करतात. अशात जर तुमच्या समोर कधी एखादा सिंह येऊन उभा राहिला तर? नक्कीच हे फार भयंकर आहे. मात्र प्रत्यक्षात तसं घडलंय.

सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण प्राणीसंग्रहालयात फिरण्याठी आला आहे. आपल्या सर्व मित्रांसह तो तेथे पोहचतो. सर्वजण आपल्याकडे असलेल्या जीपमधून तेथे फिरत असतात. मात्र यातला एक तरुण गाडीतून खाली उतरतो आणि समोर जातो. त्यावेळी येथे एक सिंह त्याच्यासमोर येऊन उभा राहतो.

सिंह पाहताच त्याच्यासमोर मृत्यू येऊन उभा राहिला आहे असं त्याला वाटतं. कोणत्याही व्यक्तीसमोर किंवा प्रण्यासमोर सिंह आला तर आपण लगेचच पळ काढतो. मात्र असे असले तरी हा तरुण तेथून पाळला नाही. उलट त्याने सिंहाला रस्ता दाखवला आणि येथून जाण्यास सांगितलं. हा तरुण नशेत असावा असं जीपमधील व्यक्ती बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण सिंहाला हाताने दिशा दाखवत आहे. सिंह देखील त्याने दाखवलेल्या दिशेने पुढे जात आहे. जणू काही सिंह रस्ता चुकलाय त्यामुळे हा तरुण त्याला रस्ता दाखवत आहे असंच व्हिडिओ पाहताना वाटतं. पुढे सुरक्षासक्षक येऊन या व्यक्तीची सुटका करतात.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्यात. तरुणाचा जीव वाचला त्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काहींनी हा तरुण नशेमध्ये होता त्यामुळे असं करू शकला असं म्हटलं आहे. तसेच आणखी एकाने म्हटलं आहे की, जंगलात किंवा अन्य झूमध्ये नागरिकांना फिरण्यासाठी प्रवेश बंद केला पाहिजे आणि वन्य प्राण्यांना सुखाने जगू दिलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra Rail Update: केंद्राचा महाराष्ट्राला गीफ्ट, दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT