चांद्रयान-३ काल यशस्वीपणे चंद्रावर उतरलं. या यशाचा जल्लोष संपूर्ण भारतभर करण्यात आला. कुठे टाळ्यांचा कडकडाट तर कुठे ढोलताशाचा आवाज येऊ लागला. सोशल मीडियावर चांद्रयानाच्या लँडिंगनंतर अनेक व्हिडीओ समोर आलेत. विविध राज्यातील मान्यवरांनी आणि राजकीय नेते मंडळींनी देखील चांद्रयान तीनच्या यशावर भाषणे केली आहेत. यातील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणाने सोशल मीडियावर हस्यकल्लोळ उडाला आहे. (Latest Marathi News)
ममता बॅनर्जींनी ISRO च्या यशानंतर भाषण केले. यावेळी रचलेल्या विक्रमाबद्दल बोलताना त्यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले. तसेच ममता यांनी इंदिरा गांधी यांच्या काळात भारताने चंद्रावर माणूस पाठवला होता याचीही आठवण करून दिली. राकेश शर्मा चंद्रावर गेल्यावर भारत वरुन कसा दिसतो असं विचारलं होतं. त्यावर सारे जहाँ से अच्छा...असं उत्तर राकेश शर्मांनी दिलं होतं.
ममता बॅनर्जी हाच मुद्दा सांगत होत्या. मात्र यावेळी त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी राकेश शर्मा ऐवजी बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते राकेश रोशन यांचे नाव घेतले. त्यांच्या या भाषणाची व्हिडीओ क्लीप कटकरुन काही सोशल मीडिया अकाउंटवर टाकण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून लोटपोट हसत आहेत.
काही नेटकऱ्यांनी यावर मिम्स देखील बनवले आहेत. यातील एका फोटोमध्ये राकेश रोशन यांना अंतराळवीराचा पोषाख देण्यात आला आहे. तर आणखीन एका व्हिडीओमध्ये ऋतिक रोशन खाली बसून रडताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.