Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video: मोये मोये! मालदीवच्या समुद्राजवळ साडी नेसून रिल बनवायला गेली अन् जोरात आपटली; VIDEO व्हायरल

Viral Video: मालदीवमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओत ही तरुणी झोक्यावर डान्स करते आणि जोरात खाली पडते. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maldives Girl Dance Viral Video:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ डान्स, गाण्याचे असतात. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर वेगवेगळ्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. असाच एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी डान्स करता करता अचानक झोक्यावरुन खाली पडते. (Latest News)

सुट्ट्यांमध्ये अनेक लोक मालदीवला भेट देतात. मालदीवचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालदीवचे सौंदर्य, तेथील राहणीमान, निळाशार समुद्राचे व्हिडिओ सर्वांनीच पाहिले असतील. तेथे अनेक लोक डान्सच्या रिल शूट करतात. परंतु रील करता करता जर कोणी समुद्रात पडले तर.. एक तरुणी रिल बनवता बनवता अचानक समुद्रात पडते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओत एक तरुणी काळ्या रंगाची सुंदर साडी नेसून छान डान्स करताना दिसत आहे. मालदीवच्या समुद्रकिनारी असलेल्या एका झोक्यावर ती अभी राहते आणि टीप टीप बरसा पाणी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. परंतु अचानक तिचा तोल जातो आणि ती जोरात खाली पडते.रिल बनवण्याच्या नादात त्या तरुणीची फजिती होते. सुदैवाने तिला यात कोणतीही दुखापत नाही.

yourtravelgenie.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'टीप टीप बरसा पाणी आणि पाण्यात जीव गेला', 'खतरों के खिलाडीचा नवीन सीझन सुरु होतोय', 'मोये मोये' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT