Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: भोगीची भाजी थेट केसांत माळली; मकर संक्रांत स्पेशल हेअरस्टाईल पाहिली का?

Makar Sankranti Hairstyle: आजवर केसांत वेणी किंवा अंबाडा घातला की त्यावर गुलाबाची फुलं, गजरा माळला जातो. मात्र या महिलेने चक्क संक्रांतीसाठी बनवली जाणारी भोगीची भाजी केसांत माळली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Makar Sankranti:

महिलांना नटण्याची आणि साजशृंगाराची फार आवड असते. प्रत्येक फेस्टिवल आणि घरातील समारंभात महिला सुदंर पोशाख परिधान करत नटतात. काही मुली केसांची वेगवेगळी आणि अतरंगी हेअरस्टाईल देखील करतात. अशात सोशल मीडियावर एका भन्नाट हेअर स्टाईलचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय.

कालच सर्वत्र मकर संक्रांत साजरी झाली. त्या निमित्त सर्व महिलांनी सुदंर रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. यात एका महिलेने अतरंगी हेअर स्टाईल केली आहे. आजवर केसांत वेणी किंवा अंबाडा घातला की त्यावर गुलाबाची फुलं, गजरा माळला जातो. मात्र या महिलेने चक्क संक्रांतीसाठी बनवली जाणारी भोगीची भाजी केसांत माळली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेने सुंदर केसांची वेणी घातली आहे. त्यावर तिने सर्वात शेवटी हरभराची पाने असलेली भाजी बांधली आहे. तर डोक्यावर तिने भुईमुगाच्या शेंगा, पावटे आणि बोरं अशा विविध भाज्या बांधल्या आहेत. विविध भाज्या बांधून महिलेने आपल्या केसांना सजवलं आहे. सोशल मीडियावर केसांच्या या अतरंगी हेअर स्टाईलचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत याला संक्रांत स्पेशल हेअरस्टाईल असं नाव दिलं आहे.

नेटकरी आता या व्हिडीओवर विविध आणि भन्नाट कमेंट करत आहेत. या आधी देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. दिवाळीच्या काळात एका महिलेने केसांवर दिवाळी स्पेशल हेअरस्टाईल केली होती. दिवाळीमध्ये सर्वजण फटाक्यांची आतिषबाजी करतात. अशात या महिलेने थेट लवंगी बॉम्ब आपल्या केसांत मळले होते. इतकेच नाही तर हेअरस्टाईल आणखी छान दिसावी म्हणून तिने केसात भुईचक्र देखील लावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, गर्लफ्रेंडनेच रचला होता कट; आधी बॉयफ्रेंडला संपवलं नंतर...

Maharashtra Live News Update: पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

कोणत्या भाजीत मोहरी घालू नये

Mahaparinirvan Din : ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, बाबासाहेबांना केलं अभिवादन

क्लासला जात असल्याचं सांगितलं, बसस्थानकावर गेल्या.. तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता

SCROLL FOR NEXT