SAAM DIGITAL Woman Bus Driver
व्हायरल न्यूज

Woman Bus Driver: हीच आमची शिवकन्या! साडी नेसून ताईनं चालवली बस; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video: पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या महिला प्रत्येत क्षेत्रात आपली वेगळी ओळख

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Bus Driver

जगभरातीत महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या महिला प्रत्येत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत प्रत्येक क्षेत्र हे पुरुष प्रधान मानले जात होते. पण सध्याच्या काळात सर्वं क्षेत्रात महिलांनी आघाडीचे स्थान निर्मांण केले आहे. अशातच सोशल मीडियावर एका महिला बस चालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओची चर्चा होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या महिलेने अशा क्षेत्रात आपलं करिअर केलं आहे, ज्यामध्ये केवळ पुरुषच आजपर्यंत काम करत आले आहेत. कारण या कामासाठी केवळ पुरुषच योग्य असल्याचे समजले जात होते. विशेष म्हणजे या व्हिडीओत महिला चक्क साडी नेसून बस चालवताना दिसत आहे. या व्हिडीओनं सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे

या व्हिडीओ आपल्याला दिसत आहे की एक महिला साडी नेसून बस चालवताना दिसत आहे. साडी नेसूनसुध्दा तिला बस चालवताना कोणच्याही प्रकारची अडचण येताना दिसत नाही. साडीमध्ये ती अगदी बिनधास्तपणे बस चालवताना दिसत आहे. कधी-कधी साडी नेसल्यानंतर महिलांना एखादं काम करता येईल की नाही अशा शंका येतात. त्यामुळे हल्ली महिला साडीऐवजी त्यांना कम्फर्टेबल वाटेल असा ड्रेस किंवा इतर कपडे परिधान करतात.

खरं तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील महिलेचे नावा मीना भगवान लांडगे आहे. त्या नाशिकमध्ये राहतात. मीना या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये काम करतात. त्या एसटी चालवतात. त्यांना सोशल मीडियाची प्रचंड आवड आहे. त्यांचं इन्स्टाग्रामवर @landgemina या नावाने अकाऊंट आहे. यामाध्यमातून त्या एसटी चालवतानाचे नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतात.

नुकताच त्यांनी नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसून एसटी बस चालवल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले असून ते व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मीना यांचे साडी नेसून एसटी बस चालवण्याचे धास पाहून अनेक जण त्यांचे कौतुक करत आहे. त्यांच्या या व्हिडीओंना लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांच्या व्हिडीओवर कमेंट्स करत एका युजरने लिहिले की, 'भारतीय नारी सर्वात भारी.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'एक नंबर ताई.' तंसच एकाने म्हटल आहे की, ' संस्कृती जपली म्हणून ताई ला प्रणाम हीच आमची शिवकन्या' बऱ्याच नेटकऱ्यांनी महिलेच्या साहसाला आणि हिंमतीला सलाम केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT