mahakumbh viral video  Meta Ai
व्हायरल न्यूज

Viral Video : ३७ वर्षांनंतर भेटली कॉलेजमधली क्रश, महाकुंभात झाली भेट; व्हिडीओ पाहून म्हणाल...

Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यामध्ये एका ऑफिसरची त्यांच्या कॉलेजमधल्या क्रशशी तब्बल ३७ वर्षांनी भेट झाली. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ही घटना एका चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Viral Video : विजय सेतुपती आणि त्रिशा कृष्णन यांचा ९६ हा तमिळ चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला. शाळा-कॉलेजमधील पहिल्या प्रेमावर या चित्रपटाची कथा आधारलेली होती. चित्रपटाचा नायक एके दिवशी अचानक त्याच्या शाळा-कॉलेजमधल्या प्रेयसीला भेटतो. पहिलं प्रेम पुन्हा भेटल्यानंतरची बेचैनी, आनंद आणि काहीसं दुख अशा भावना या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटासारखी घटना महाकुंभमेळ्यात घडली आहे.

महाकुंभमेळ्यातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ९६ या तमिळ लव्हस्टोरीला लाजवेल अशी कथा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. महाकुंभमेळ्यामध्ये तैनात असणारे संजीव कुमार सिंह त्यांच्या कॉलेजमधल्या क्रशला तब्बल ३७ वर्षांनी भेटले. ते फायर ऑफिसर आहेत. संजीव यांची कॉलेजमधली क्रश त्यांना कुंभमेळ्यात सेक्टर १७ च्या पार्किंगमध्ये भेटली.

संजीव कुमार यांनी त्यांच्या वर्गमैत्रिणीचे (क्रशचे) नाव रश्मी गुप्ता असल्याचे या व्हिडीओमध्ये सांगितले. त्या लखनौमधील एका कॉलेजमध्ये शिक्षिका आहेत. या व्हिडीओमध्ये संजीव आपल्या मैत्रिणीला तब्बल ३७ वर्षांनी भेटल्याचे सांगतात. कॉलेजमध्ये असताना रश्मी यांच्यावर त्यांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असल्याचे म्हणतात. इतक्या वर्षांनी भेट झाल्यानंतर दोघेही आनंदी झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

त्यानंतर संजीव हे त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून रश्मी यांना पवित्र संगमावर स्नान करण्याची व्यवस्था करुन देतात. संजीव आणि रश्मी यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संजीव कुमार हे सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर १५ हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT