Maha Kumbh Mela 2025 saam tv
व्हायरल न्यूज

Viral Videos : भगव्या रंगाची कार, गाडीला आईचा दर्जा अन् ३५ वर्षांपासून सोबत, कुंभमेळ्यात चर्चेत आलेले 'ॲम्बेसेडर बाबा' कोण आहेत?

Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेश मधील प्रयागराजमध्ये होणारा कुंभमेळा १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. आता संपुर्ण भारतात या महाकुंभाची चर्चा सुरू झाली आहे.

Saam Tv

उत्तर प्रदेश मधील प्रयागराजमध्ये होणारा कुंभमेळा १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. आता संपुर्ण भारतात या महाकुंभाची चर्चा सुरू झाली आहे. त्यात ३२ वर्षांपासून स्नान म्हणजेच अंघोळ न करणारे धोटू बाबा यांची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली. आता महाकुंभात अशा एका आणखी एक बाबांची स्वारी आली आहे ज्यांनी १९७२ च्या मॉडेल अॅम्बेसेडरचा प्रवास करत आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते गाडी चालवत आहे.

या व्हायरल होणाऱ्या बाबाचं नाव महंत राज गिरी नागा बाबा आहे. याच नावाने ते अनेक वर्ष ओळखले जात आहेत. शिवाय त्यांचं दुसरं ओळखीचं नाव म्हणजे अॅम्बेसेडर बाबा आहे. हे महंत राज गिरी बाबा म्हणाले, 'मी इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणाहून आलो आहे. मी चौथ्यांदा ह्या कारने कुंभमेळ्याचा दौरा करतोय. ही गाडी मी म्हणेन तिथे मला घेऊन जाण्याची परवानगी देते, साथ देते. ही गाडी १९७२ मधल्या मॉडेल्सपैकी एक आहे. तसेच या गाडीचा प्रवास मी गेली ३५ वर्षे करतोय.'

हे प्रसिद्ध बाबा पुढे म्हणाले की, मी पंचस्नान जुन्या आखाड्याशी संबंधीत आहे. ही गाडी मला या आखाड्यात न चुकता घेऊन येत आहे. या गाडीत खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था असते. ही गाडी मला माझ्या आईसारखी आहे. पुढे बाबा म्हणाले, जर माझ्या गाडीला काही दुखापत झाली तर माझ्याकडे टूल बॉक्स आहे. मीच ही गाडी दुरुस्त करतो. मात्र माझी गाडी जास्त खराब होत नाही. मी महाकुंभ झाल्यावर बनारसला सुद्धा या गाडीने जाणार आहे.

कुंभमेळा हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. हा मेळा हिंदू धर्माच्या श्रद्धेनुसार चार ठिकाणी – प्रयागराज (इलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक – या ठिकाणी ठराविक कालावधीत भरतो. कुंभमेळा लाखो भाविक आणि साधू-संत यांना आकर्षित करतो, जे पवित्र नद्यांमध्ये स्नान करून मोक्षप्राप्तीची इच्छा व्यक्त करतात.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT