Lucknow Road Video
Lucknow Road Video Saam TV
व्हायरल न्यूज

Lucknow Road Video : रस्त्यावर अचानक पडला भलामोठा खड्डा, धावती कार मधोमध लटकली, पाहा VIDEO

Ruchika Jadhav

Vikashnagar Viral Video :

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक थरारक घटना समोर आली आहे. रविवारी पावसामुळे विकास नगर येथे सेक्टर ४ मध्ये रस्त्याला मोठा खड्डा पडला. एखादी खोल दरी जशी तयार होते, त्याप्रमाणे हा रस्ता खचला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओतील दृश्य खरोखरच थरारक आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपली चारचाकी घेऊन रस्त्याने जात आहे. येथून जाताना अचानक या रस्त्याला मोठा खड्डा पडतो. जणू काही रस्ता अचानक गायब झालाय असं व्हिडीओ पाहताना वाटतंय. रस्ता अचनाक खोल दरीमध्ये गेल्याने ही कार अर्धी खड्ड्यात आणि अर्धी रस्त्यावर अशा स्थितीत उभी होती. कार चालकाचा जराजरी तोल गेला असता तर ही कार खड्ड्यामध्ये पडली असती.

मात्र घटना घडताच नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशामक दलासह घटनास्थळी धाव घेतली आणि कार चालकाला सुखरूप वाचवले. पावसामुळे या रस्त्याला तब्बल २० फूट खोल खड्डा पडला आहे. लखनऊमधील या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर @zoo_bear आणि @Satyamooknayak या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ४ लाख ५१ हजार व्युव्ज आणि ११ हजार लाइक्स मिळाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे येथील रस्त्याचे भूस्खलन झाले असावे असं प्राथमिक तपासात दिसत आहे. सदर घटना घडल्यानंतर येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. रस्त्यावर वाहतूक सुरू असताना पुन्हा अशी घटना घडली तर, अशी भीती येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Side Effects: नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनचा लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

SCROLL FOR NEXT