Mehndi Make at Home : घनदाट आणि काळ्या केसांसाठी महिलेने घरच्याघरी तयार केली मेहंदी; VIDEO होतोय तुफान व्हायरल

Viral Video : महिलेने व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी एका भांड्यात पाणी घ्या. त्यामध्ये चहापावडर, कडीपत्ता, जवस, मेथी टाकून घ्या. या पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर पाणी गाळून घ्या.
Mehndi Make at Home
Mehndi Make at HomeSaam tv

Hair Mehandi Make at Home :

केसांच्या समस्या आजकाल प्रत्येक तरुण मुलांमुलींमध्ये पाहायला मिळतात. अनेक तरुणांमध्ये २५ वयानंतर केस पांढरे होऊ लागतात. तसेच टक्कल पडू लागते. या समस्यांपासून दूर जाण्यासाठी महिला तसेच तरुणी केसांना मेहंदी लावतात. मात्र मेहंदी लावल्याने केस आणखी खराब झाल्याची तक्रार देखील अनेक जणी करतात. अशात सोशल मीडियावर घरच्या घरी मेहंदी बनवतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Mehndi Make at Home
Shraddha Kapoor: अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये श्रद्धा कपूरसोबत असलेला मिस्ट्री मॅन कोण?, VIDEO होतोय व्हायरल

तुम्हालाही मेहंदी लावायची सवय असेल. तसेच पांढऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मेहंदी भिजत ठेवू शकता. यासाठी महिलेने शेअर केलेल्या व्हिडीओमधील साहित्य जाणून घेऊ.

सर्वात आधी हिना मेहंदीचे पाकीट, पाणी, चहापावडर, कडीपत्ता, जवस, मेथी, आवळा, बीट, जास्वंदाची फुलं, कोरफड, आवळा तेलाचा उरलेला चोथा, लोखंडी कढई हे साहित्य तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

महिलेने व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी एका भांड्यात पाणी घ्या. त्यामध्ये चहापावडर, कडीपत्ता, जवस, मेथी टाकून घ्या. या पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर पाणी गाळून घ्या. तयार झालेलं जेल एका भांड्यात काढून ठेवा.

पुढे आवळा, बीट, जास्वंदाची फुलं, कोरफड या सर्व गोष्टी मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर एका सुती कापडात हे सर्व मिश्रण गाळून घ्या. त्यामध्ये आवळ्याचा बारीक चोथा मिक्स करा. आवळा, बीट, जास्वंदाची फुलं, कोरफड यामध्ये मेहंदी मिक्स करा. यासाठी लोखंडी कढईचा वापर करा. तसेच सरुवातीला बनवलेलं जेल देखील यामध्ये मिक्स करा.

आता हे सर्व मिश्रण रात्रभर मुरत ठेवा. सकाळी केसांना व्यवस्थीत अप्लाय करा. त्यानंतर केसांमध्येत किमान ३ तास हे सुकवून घ्या. त्यानंतर आधी फक्त पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. तसेच नंतर केसांना तेल लावून केस धुवून घ्या. मेहंदी भिजवतानाचा हा व्हिडीओ महिलेने @varshas.kitchen.37 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलाय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Mehndi Make at Home
Anant-Radhika Pre wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये 'खान्स'चा जलवा, सलमान-शाहरुख-आमिरचा 'नाटू-नाटू'वरील डान्स VIDEO Viral

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com