Train Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Train Viral Video: पावसाळा आहे भौ, चड्डी-बनियन सुकणार कशी? मग काय भावानं नादच केला, ट्रेनमध्येच सुकत ठेवले कपडे; Video

Drying Clothes in Virar Local Train: विरार लोकलमध्ये पुरुषांनी चक्क डब्यात कपडे सुकवले. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून नेटिझन्सनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया.

Manasvi Choudhary

पावसाळ्याच्या दिवसात कपडे सुकत नाही ही तक्रार सामान्य आहे. घराच्या बाल्कनीत कपडे सुकायला घातल्यानंतर पावसाने भिजतात यामुळे महिला हॉल किंवा बेडरूममध्ये खास कपडे सुकण्याची सोय करतात पण मात्र तुम्ही कधी ट्रेनमध्ये कपडे सुकताना पाहिले आहेत का? नसेल पाहिलं तर खालील व्हिडीओ पाहाच.

सोशल मीडियावर ट्रेनचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात. रोजच्या ट्रेनच्या प्रवासात कोण काय करेल याचा कोणीही विचार करणार नाही. ट्रेनमध्ये अनेक महिला या भाज्या देखील निवडतात यामुळे त्यांचा घरी जाऊन काम करण्याचा वेळ वाचतो अशातच आता ट्रेनमध्ये व्यक्तींनी जे केल आहे ते पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विरार ट्रेनमध्ये पुरूषांच्या डब्ब्यात चक्क कपडे सुकत घातले आहेत. पुरूषांची गर्दी असलेल्या या डब्ब्यात निळ्या रंगाची पॅन्ट आणि पिवळ्या रंगाचा टिशर्ट सुकत घातलेला दिसत आहे. याचदरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

@chalo.virar या इन्स्ट्राग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ये विरार लोकल मे क्या हो रहा है असं या शेअर केलेल्या व्हिडीओचं कॅप्शन आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लाखो लाईक्स आणि प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने, पावसाळ्याचे दिवस आहेत... तर आणखी एकाने रिसॉर्ट ला गेला होता तो असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

High blood pressure: सकाळी तुमच्या या ३ सवयींमुळे वाढतोय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल

SCROLL FOR NEXT