CCTV Footage Saam TV
व्हायरल न्यूज

CCTV Footage : बिबट्याचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला; गावकऱ्यांमध्ये भीती, CCTV फुटेज व्हायरल

Leopard Attacks On 12 Goats : दोन्ही ठिकाणच्या मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्याची दहशत नागरिकांमध्ये पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत

Ruchika Jadhav

रोहिदास गाडगे

Khed Pune :

खेड तालुक्यातील दोंदे गावातील म्हात्रे वस्ती आणि उढाणेवस्तीत बिबट्याची दहशत पसरली आहे. रात्रीच्यावेळी दोन ठिकाणी शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केलाय. यामध्ये १२ शेळ्या आणि बोकडांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. हल्ल्याचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शेळ्यांच्या बंदिस्त गोठ्यात बिबट्याने प्रवेश केल्यावर शेळ्या आणि बेकाडाने जिवाच्या अकंताने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याच्या क्रूर हल्ल्यात १२ शेळ्या आणि बोकड ठार झाले. यामुळे दोन्ही ठिकाणच्या मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्याची दहशत नागरिकांमध्ये पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

सदर घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास देखील घाबरत आहेत.

अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला बिबट्याने नेले उचलून

२ दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यात देखील अशीच एक थरारक घटना घडली होती. बल्लारपूर शहराच्या सीमावर्ती भागात दीनदयाल वॉर्डात बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली.

अंगणात खेळत असलेल्या साफिया इकबाल शेख या चिमुकलीवर बिबट्याने अचानक हल्ला करत तिला उचलून नेलं होतं. सोबत खेळत असलेल्या तिच्या बहिणीने घराकडे धूम ठोकून आपल्या काकांना ही माहिती सांगितली. त्यानंतर या चिमुकलीची सुटका झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT