Latur Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Latur Viral Video: लातूरला पावसाने झोडपलं, पूलावर पाणीच पाणी; भरपावसातही दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास, Video Viral

Latur Rain Viral Video: लातुरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नदी, ओढ्यांना पुर आला आहे. याच पावसात नागरिक पुलावरुन प्रवास करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पुर आल्याच्या घटना घडल्या आहे. ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्कदेखील तुटला आहे. लातूरमधील रेनापुर तालुक्यातील शिंदगाव आंदलगाव आणि पोहरेगाव या गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी गेले आहे. तरीही या पुलावरुन नागरिक प्रवास करताना दिसत आहे. नागरिकांच्या या जीवघेणा प्रवासाचे व्हिडिओ समोर आले आहेत.

लातूरमध्ये अनेक गावात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नाले, ओढ्यांना पुर आले आहेत. शिंदगाव आणि पोहरेगावांना जोडणारा एक पुल पावसाच्या पाण्यात पूर्णपणे झाकला गेला आहे. पावसाचे पाणी पुलावरुन ओसंडून वाहत आहे. याच पावसातून अनेकजण जीवघेणा प्रवास करत आहे. दुचाकीस्वार या पाण्यातून जाताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरुन पाणी जाण्याच्या घटना नेहमी घडत असतात. अनेकदा नागरिकांना पुलाची उंची वाढवण्याची मागणीदेखील केली आहे. या नागरिकांचा जीवघेणा प्रवास कॅमेरात कैद केला आहे. या व्हिडिओत अनेक गावकरी पुलावरुन जाताना दिसत आहे. या व्हिडिओत संपूर्ण पूल पाण्यात गेलेला दिसत आहे. या पुलावरुन तर एक दुचाकीस्वार आपली बाईक घेऊन जाताना दिसत आहे. ही प्रवास त्यांच्या जीवावर बेतू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

SCROLL FOR NEXT