PAK vs NED: पुल शॉटवर खणखणीत षटकार मारताच नेदरलँडच्या फंलदाजाने हॅरीस रउफला डिवचलं; VIDEO होतोय व्हायरल

Bas De Leede Six: बेस डे लीडने षटकार मारल्यानंतर हॅरीस रउफला डिवचल्याचे पाहायला मिळाले आहे.
Bas De Leede
Bas De Leedeinstagram/icc
Published On

Reaction Of Bas De Leede After Six:

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हैदराबादच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात नेदरलँडला पराभवाचा सामना करावा लागला.

मात्र नेदरलँड संघातील खेळाडू खेळाडू बेस डे लीडने दमदार खेळ करत सर्वांची मनं जिंकली आहेत. या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना ६२ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना ६७ धावांची तुफानी खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने एकापेक्षा एक भन्नाट शॉट मारले. दरम्यान पाकिस्तान संघातील वेगवान गोलंदाज हारीस रउफच्या गोलंदाजीवर त्याने पुल शॉट मारत षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Bas De Leede
Asian Games 2023: भारतीय नारींचा एशियन गेम्समध्ये डंका! कबड्डीत सुवर्णपदकावर कोरलं नाव

बेस डे लीडचा षटकार..

तर झाले असे की, नेदरलँड संघाची फलंदाजी सुरू असताना २९ वे षटक टाकण्यासाठी हारीस रउफ गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर हारीस रउफने बाउन्सर चेंडू टाकला.

या चेंडूला जोरदार प्रतुत्यर देत बेस डे लीडने खणखणीत षटकार मारला. दरम्यान षटकार मारल्यानंतर बेस डे लीडने हारीस रउफला डोळा मारला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

बेस डे लीडच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावण्यासह ४ गडी बाद केले आहेत. यासह तो वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावण्यासह ४ गडी बाद करणाारा तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचरने आणि नील जॉनसनने हा कारनामा करून दाखवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com