Train Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Train Viral Video: बाळाला घट्ट मिठी मारून आईचा मृत्यूच्या वाटेवर प्रवास; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Woman Traveling With Baby Viral Video: मृत्यूच्या वाटेवर प्रवास; धावत्या ट्रेनच्या दोन डब्ब्यांमधील जॉइंटवर बसली आई, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ Viral

Ruchika Jadhav

Viral Video: सोशल मीडिया हे एक असं मध्यम आहे जिथे कायमच काही ना काही व्हायरल होत असतं. लोकल ट्रेनने प्रवास करताना त्याचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते, अन्यथा मोठे अपघात होतात. मुंबईची लाइफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये कायमच गर्दी पाहायला मिळते. या गर्दीतून मार्ग काढत काही व्यक्ती जीवाची पर्वा न करता प्रवास करतात.(Latest Viral Video)

सध्या एका आईचा आपल्या बाळासोबतच्या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओपाहून तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला ट्रेनच्या दोन डब्ब्यांमधील असलेल्या जॉइंन्डमध्ये बसली आहे. विशेष म्हणजे ही महिला एकटी नसून आपल्या काळजाचा तुकडा म्हणजेच बाळाला घेऊन असा भयंकर प्रवास करत आहे.

जॉइंडवर बसण्यासाठी पुरेशी जागाही नाही. तरी देखील महिला तेथे बसली आहे. या महिलेचा व्हिडिओ ट्रेनमध्ये बसलेल्या अन्य एक व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. महिला अशा पद्धतीने प्रवास करताना थोडी जरी हालली असती तर तिचा आणि तिच्या बाळाचा रेल्वेच्या चाकांखाली चिरडून मृत्यू झाला असता.

व्हिडिओ (Video) पाहून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. महिलेला आपल्या बाळासह एका ठिकाणी जायचे होते मात्र तिच्याकडे पैसे नव्हते. टीसीने पकडल्यामुळे तिने पुन्हा प्रवास करण्यासाठी हा मार्ग निवडला अशी माहिती व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने ट्वीटवरुन सांगितली आहे.

सदर व्हिडिओ @ZahidHA68 या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याचा काही व्यक्ती दावा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT