Robbery In Chhatrapati Sambhajinagar Saam Tv
व्हायरल न्यूज

Robbery In Chhatrapati Sambhajinagar: मुलाचा मित्र सांगून जवळ आला, महिलेचे ४ लाखांचे सोनं घेऊन गेला

Chhatrapati Sambhajinagar Video: छत्रपती संभाजीनगरमधील एका घटनेने महाराष्ट्र हादरुन गेलेला आहे. ज्यामध्ये भररस्त्यात एका वृद्ध महिलेच्या अंगावरील ४ लाखांचे सोन्याचे दागिने चोरले आहे. सध्या याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Gold Jewelry Robbed: छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिकनगर परिसरात वृद्ध महिलेसोबत फसवणुकीची धक्कादायक घटना घडली आहे. एका चोरट्याने मुलाचा मित्र असल्याचे सांगून एका वृद्ध महिलेच्या अंगावरील ४ लाखाचे सोन्याचे दागिने चोरले. या घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नेमके घडले तरी काय?

रस्त्यावर(Road) ऑटो वाट पाहणाऱ्या आजीला गोड बोलून मी तुमच्या मुलाचा मित्र असल्याचे सांगितले. आजीचा विश्वास संपादन करून तुमच्या मुलाचा चेक आला आहे तो चेक लॅप्स होईल. त्याचे वाईट परिणाम होतात. तुम्ही मला तुमचे सोन्याचे मंगलसूत्र व बांगड्या काढून द्या असे सांगितले.

चोराने त्यानंतर, मी मेडिकलमधून वजन करून पावती आणून देतो. अशी थाप मारली आणि वृद्ध महिलेचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी सर्व दागिने काढून दिले. आणि चोरट्याने दागिने हाती लागतात त्या ठिकाणावरून धूम ठोकली.

हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही(cctv) कॅमेऱ्यात कैद झाला असून तब्बल ४ लाखांचे दागिने त्या चोरट्याने पळवले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT