Rolce Royce Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Desi Jugad Video: भन्नाट! मारुती 800 पासून बनवली आलिशान रोल्स रॉयस; अवघ्या ४५ हजारात जगावेगळा जुगाड | VIDEO

Rolce Royce Viral Video: तरुणाने मारुती ८०० गाडीचे मॉडिफिकेशन करत अशी रोल्स रॉयस बनवली, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

Gangappa Pujari

Maruti 800 Convert in Rolls Royce:

सोशल मीडिया (Social Media) हा असंख्य भन्नाट व्हिडिओंचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक जबरदस्त आणि आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या अशाच एका तरुणाच्या चक्रावून टाकणाऱ्या जुगाडाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या तरुणाने मारुती ८०० गाडीचे मॉडिफिकेशन करत अशी रोल्स रॉयस बनवली, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

जगावेगळा जुगाड...

जगात अशी अनेक लोक आहेत जी त्यांची भन्नाट कल्पकता वापरुन असा काही जुगाड करतात, ज्याचा आपण कधी विचारही करु शकत नाही. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, शेतीमधील अवजारांचा जुगाड करण्याचा जणू काहींना छंदच असतो. सध्या अशाच एका चक्रावून टाकणाऱ्या जुगाडाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

मारुती 800 पासून बनवली रोल्स रॉयस...

केरळमधील (Keral) हा तरुण सध्या जगात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे त्याने केलेला जगावेगळा जुगाड. या तरुणाने आपली कल्पकता आणि कुशाग्र बुद्धी वापरुन मारुती ८०० गाडीचे चक्क आलिशान रोल्स रॉयसमध्ये रुपांतर केले आहे.

केरळच्या तरुणाचा पराक्रम..

मारुती 800 (Maruti 800) ही कधीकाळची प्रसिद्ध गाडी. सध्या ही गाडी खूप कमी पाहायला मिळते. याऊलट रोल्स रॉयस (Rolce Royce) हे नाव आलिशान आणि रुबाबदार गाड्यांची कंपनी म्हणून जगप्रसिद्ध आहे. रोल्स रॉयस गाडी घेणे हे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे स्वप्न.

पण केरळच्या या तरुणाने जुन्या मारुती ८०० मध्ये असा काही बदल केला की गाडीचा लूक पुर्णपणे रोल्स रॉयस सारखा झाला. हदीफ असे या तरुणाचे नाव आहे. हदीफने अवघ्या ४५ हजारांत ही मारुती ८०० गाडी खरेदी केली होती. त्याने या गाडीमध्ये बदल करत चक्क त्याचा रोल्स रॉयस सारखा आलिशान लूक तयार केला.

व्हिडिओ व्हायरल!

आपल्या या भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ त्याने त्याच्या युट्यूब अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासोबत त्याने या जुगाडाची माहितीही चाहत्यांना सांगितली आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला असून या भन्नाट कलेचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त त्याच्या या भन्नाट जुगाडाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT