Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पेट्रोल घेऊन गेला अन् शोरूमलाच लावली आग, कारण काय? पाहा व्हिडीओ

Ola Showroom Fire Viral Video: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्राहकांचे रागाच्या भरात चक्क ओला शोरुमला आग लावली आहे.

Siddhi Hande

कर्नाटकामध्ये ओला इलेक्ट्रिक शोरुमला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ग्राहकाने संतापच्या भरात असे कृत्य केले आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्राहकाने त्याला चांगली सेवा मिळाली नसल्याने थेट शोरुमलाच आग लावली आहे. या घटनेमुळे कंपनीच्या सेवेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मोहम्मद नदीम असे या ग्राहकाचे नाव होते. त्याने वीस दिवसांपूर्वी ओला कंपनीमधून एक नवीकोरी स्कूटर खरेदी केली होती. या स्कूटरमध्ये पहिल्यापासूनच प्रॉब्लेम्स दिसत होते. त्यामुळे ग्राहकाला नवीन स्कूटर खरेदी करुनही मनस्ताप झाला होता.

नदीमन कलबुर्गी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये वारंवार तक्रार केली होती. नदीमने सतत स्कूटर सर्व्हिसिंगची मागणी केली होती. मात्र, कंपनीने कोणत्याही प्रकारची सर्व्हिसिंग दिली नाही. त्यामुळे नदीमने हे पाऊल उचलले.

नदीम सतत शोरुमला जावूननदेखील त्याच्या गाडीची समस्या सोडवण्यात आली नाही. त्यामुळे नदीमला खूप राग येऊ लागला. गाडीच्या सर्व्हिसिंगचे काम नीट नाही झाल्यामुळे नदीम मंगळवारी शोरुमध्ये पेट्रोल घेवून गेला होता. त्याने त्या संतापामुळे सहा बाईकवर पेट्रोल टाकून वाहनांना पेटवलं. काही वेळातच आग सर्वत्र पसरली. या घटनेमुळे सर्व्हिसिंग सेंटरमधील सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित बाहेर काढण्यात आलं. नदीमच्या या संतापामुळे त्याने सुमारे ८५०,००० रुपयांचं नुकसान झालं आहे. पण या घटनेमुळे कोणालाही जीवितहानी नाही झाली आहे. पोलिसांना या घटनेविषयी माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले.

कंपनीची प्रतिक्रिया

भारतातील ओला इलेक्ट्रोनिक कंपनी ४३१ सर्व्हिस सेंटर चालवत आहे. या घटनेवर ओला कंपनीने आपले कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ग्राहकांना उत्तम सर्व्हिस मिळत नसल्याने अनेक ग्राहकांनी ओला कंपनीविरोधात तक्रार केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT