Girls Fighting Saam Tv
व्हायरल न्यूज

Girls Fighting : एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, जमिनीवर पाडून धूधू धुतलं; कॉलेजबाहेर तरुणींचा तुफान राडा, पाहा VIDEO

Girls Fighting Video Viral: जमशेदपूर येथे कॉलेजबाहेर मुलींमध्ये तुफान हाणामारी झाली. चप्पल फेकून मारामाऱ्या झाल्या आणि केस ओढण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

झारखंडमधील जमशेदपूर येथे कॉलेजबाहेर मुलींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर मुलींनी राडा केला आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विद्यार्थीनीच्या या कृत्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

जमशेदपूर येथील परसुडीह पोलीस स्टेशन परिसरातील एसपी इंटर कॉलेजमध्ये या मुली शिकत आहे. मधली सुट्टीदरम्यान बाहेर कॉलेजच्याबाहेर या मुलींमध्येच मारामारी झाली आहे. कॉलेच्या गणवेशात या मुली दिसत आहे. पहिल्यांदा काही मुलींनी एकमेकींशी हुज्जत घातली. नंतर एकमेकींचे केस ओढत चपला फेकून मारल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, १० ते १५ मुलींमध्ये ही हाणामारी झाली आहे. मुलींमध्ये मारामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

विद्यार्थींनीच्या या भांडणामध्ये कोणीही मध्यस्ती केलेली दिसत नाही. दरम्यान स्थानिक लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा ते देखील हादरले. कॉलेज व्यवस्थापनाला या संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. यावेळी काही शिक्षकांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती शांतपणे हाताळली. दरम्यान हाणामारी केलेल्या विद्यार्थिनींना ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT