Viral Dance Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: ह्याला म्हणायचं अस्सल टॅलेंट! सफाई कर्मचाऱ्याने केला असा डान्स; नेटकरी म्हणाले, मायकल जॅक्सन...

Dance Video: गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Dance Video

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यात लहानांपासून ते वयोवृद्धांचा देखील समावेश आहे. सोशल मीडियाचे जसे फायदे आपल्याला आहेत, त्याचबरोबर त्याचे नुकसान देखील आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील व्यक्तीसुद्धा आपलं टॅलेंट जगासमोर मांडताना दिसून येत आहेत.अशातच सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सफाई कामगाराचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता येत नाही. कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडताच काही स्वप्न मागे सोडत पुढे निघावं लागतं. धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आपली स्वप्नं,कला जोपासता येत नाही.

काही छुपे कलाकार कुटुंबाच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जातात. मात्र, फार कमी जण घरची जबाबदारी सांभाळत त्यांचं टॅलेंट जपतात. असाच मलप्पुरमचा सफाई कर्मचारी रघु वरण सोशल मीडियावर चांगलाच चमकला आहे. ऑन ड्युटी असताना रघुने केलेला डान्स सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

मलप्पुरमच्या रघु वरणने इन्स्टाग्रामचा खूप चांगला उपयोग केला आहे. रघु वरणेने इन्स्टांग्रामवर त्याच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. रघु वरणचे- डान्स व्हिडिओ लाखो जणांकडून पाहिले जातात. रघु वरणच्या डान्सचं नेटकऱ्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

Chinmayee Sumeet : "होय मी जयभीमवाली..."; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य

Shivani Rangole Photos: शिवानीचं मराठमोळं सौंदर्य! जांंभळ्या साडीत दिसतेय खूपच भारी

SCROLL FOR NEXT