Mumbai Vada Pav Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Vada Pav Mumbai : मुंबईतील एका महिलेची ११ वर्षांची वडापाव विक्रीची प्रेरणादायी कहाणी. चव, मेहनत आणि प्रेमळ स्वभावाने ग्राहकांची मने जिंकत तिने संघर्षातून यश मिळवले.

Manasvi Choudhary

मुंबई म्हटलं की प्रसिद्ध खाद्यपदार्थ डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वडापाव. मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव हा जगप्रसिद्ध आहे. कोणत्याही भागातून मुंबईला आलेला व्यक्ती कधीच उपाशी राहत नाही. आज अनेकजण मुंबईसारख्या शहरात वडापाव विकून मोठे झाले आहेत. यासर्वांची मेहनत देखील मोठी आहे. सोशल मीडियावर सध्याच याचसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे.

मुंबईतील एका महिलेची लिंक्डइन पोस्ट लक्ष वेधून घेते आहे. या व्हायरल पोस्टमध्ये एका मुलीने तिच्या आईचा प्रेरणादायी प्रवास सांगितला आहे. मागील गेली ११ वर्षे बीएमसी रूग्णालयाबाहेर तिची आई वडा पावचा स्टॉल चालवत आहे. येथे वडापाव विकत या महिलेने केवळ भूक भागवली नाही तर अनेकांशी प्रेमळ नाते संबंध देखील निर्माण केले आहेत.

पोस्टमध्ये एका मुलीने, तिची आई वडा पाव कशी विकते. तिच्या आईला पाच भाषा बोलायला येतात. ज्या ग्राहकांचे मन जिंकतात हे दाखवून दिलं आहे.

तिने सांगितलय की, आमचा सुरूवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. आईला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अनेकदा स्टॉलमधील आमच्या वस्तू चोरी गेल्या. स्टॉला फोडला गेला. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी विरोध केला मात्र माझ्या आईचे प्रयत्न सुरूच होते. ती थांबली नाही, तिने तक्रार देखील केली नाही. तिने स्वच्छतेला प्राधान्य दिलं. वडापावच्या चवीतून लोकांची मने जिंकली. तिने ग्राहकांना पटवून दिले की ती सर्वकाही मेहनतीने घरी बनवते.

विशेष म्हणजे माझ्या आईला खास बनवणारी तिची एक गोष्ट म्हणजे ती लोकांशी कशी जोडते. तिला पाच भाषा येतात (मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू आणि थोडी इंग्रजी देखील) जरी तिचे शिक्षण झाले नसले तरी या पाच भाषांचे ज्ञान तिला आहे. यामाध्यमातून ती ग्राहकांशी बोलते. ती खूप हुशार आहे. ती सतत आनंदी असते. तिला ज्यामध्ये आनंद वाटतो. ते ती करते असंही मुलीने म्हटलं आहे.

पुढे, मुलीने सांगितले की, माझी आई दयाळू आहे. लोकांना ज्या भाषेत बोलता येते. त्या भाषेत ती त्यांच्याशी बोलते त्यांना समजावून सांगते. 'मी जेव्हा स्टॉलला जाते, तेव्हा मला लोक तिच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात ' हे मला दिसलय. जणू काही ते त्यांच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटले आहेत. असंही ती म्हणते.

सोशल मीडियावर @Ishika Dhanmeher या पेजवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी आईच्या या कलेचे कौतुक केले आहे. एका युजरने, "एका उल्लेखनीय महिला उद्योजिकेची अभिमानी मुलगी, खरोखर प्रेरणादायी!" तर आणखी एकाने, "तुमच्या आईला सलाम! नातेसंबंध निर्माण करणे आणि ते टिकवणे हे केवळ व्यवसायासाठीच नाही तर वाढीसाठी देखील महत्त्वाचे आहे, तुमची आई प्रेरणा आहे!".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT