Indigo Flight Saam Tv
व्हायरल न्यूज

Flight Video: विमानामध्ये चक्क झुरळांचा सुळसुळाट; प्रवाशाने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप, व्हिडिओ व्हायरल

Indigo Flight Viral VIdeo: इंडिगोच्या विमानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंडिगोच्या एका विमाच्या फूड एरियात झुरळ दिसले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indigo Flight Cocroaches Found In Food Area Video Viral:

इंडिगोच्या विमानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंडिगोच्या एका विमाच्या फूड एरियात झुरळ दिसले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.

इंडिगोच्या विमानात जेवणाच्या विभागात झुरळांचा वावर दिसून आला. यामुळे प्रवाशांना मिळणारे खाद्यपदार्थ हे चांगले आहेत की नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एका प्रवाशाने एअर इंडिगोच्या विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओत इंडिगोच्या फूड एरियामध्ये अनेक झुरळे वावरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिथे खूप अस्वच्छता असल्याचे दिसत आहे. व्हिडिओवर विमानाच्या फूड एरियात आणि इतर ठिकाणी झुरळांचा वावर पाहायला मिळाला. हे खूप जास्त भयंकर आहे. याची चौकशी होईल अशी अशा आहे, असे कॅप्शन दिले आहे.

Tarun Shukla या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी प्रवाशांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

या पोस्टमध्ये इंडिगोने उत्तरदेखील दिले आहे. इंडिगोने म्हटले आहे की, आम्हाला या व्हिडिओबद्दल माहिती आहे. आमच्या विमानातील एक कोपर हा खूप घाणेरडा दिसत आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी यावर कारवाई केली आहे. या फ्लाइटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. आम्ही विमानात स्वच्छतेचा खबरदारी घेतो. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही माफी मागत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT