इंडिगो फ्लाइटमध्ये (Indigo Flight) बसलेल्या एका प्रवाशाने फ्लाइट दरम्यान सर्व्ह केलेल्या सँडविचमध्ये खिळे सापडल्याचा दावा केला. मात्र, प्रवासादरम्यान प्रवाशाने अशी तक्रार केली नसल्याचं इंडिगोने म्हटलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रवाशाने सँडविचच्या छायाचित्रासह त्याचा अनुभव शेअर केला आहे. (Latest Crime News)
इंडिगोने सांगितलं की, 1 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू-चेन्नई दरम्यान कार्यरत असलेल्या फ्लाइट 6E-904 मधील एका प्रवाशाने सोशल मीडियावर फोटोसह अनुभव शेअर केला आहे. याप्रकरणी इंडिगोने एक निवेदन जारी केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्हाला या घटनेबद्दल माहिती आहे. परंतु, प्रवासादरम्यान कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर (Indigo Flight Passenger Claim) आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इंडिगोच्या एका प्रवाशाने दावा केला की, फ्लाइटमध्ये सर्व्ह केलेल्या सँडविचमध्ये त्याला स्क्रू (Screw In Sandwich) सापडला आहे. त्याने सँडविचचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच प्रवाशाने या समस्येवर उपाय काय, असा सवालही केला आहे. या इंडिगो प्रवाशाने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सँडविचमध्ये स्क्रू सापडल्याची तक्रार केली आहे.
या इंडिगो प्रवाशाने सांगितलं की, 1 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू ते चेन्नई या फ्लाइट दरम्यान त्याला पालक आणि कॉर्न सँडविच देण्यात आलं होतं. प्रवासादरम्यान त्यानी विमानात सँडविच खाल्लं नाही. नंतर, जेव्हा त्याने बाहेर पोहोचून पॅकेट उघडले, तेव्हा त्याला सँडविचमध्ये स्क्रू (Indigo Flight Screw In Sandwich) दिसला. या घटनेने त्याला धक्का बसला.
विमान कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचे सांगितलं. परंतु प्रसारित केलेल्या प्रतिमेबद्दल त्यांनी काहीही सांगितलेलं नाही. ती प्रतिमा प्रसारित केली जात असल्याबद्दल कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही, असं इंडिगोने (Indigo Flight) म्हटलं आहे.
आमचे फ्लाइटमधील जेवण हे प्रतिष्ठित आणि उच्च दर्जाच्या कॅटरर्सकडून गुणवत्ता आणि स्वच्छतेचे उच्च दर्जा राखण्यासाठी घेतले जाते. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर (latest news) आहोत. फ्लाइटमध्ये शक्य तितका सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आणि सर्व खाद्यपदार्थांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं इंडिगोने सांगितलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.