Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

अमेरिकेत दुकानाबाहेर एका भारतीय तरुणाला परदेशी व्यक्तीने मारहाण केली. प्रत्युत्तरादाखल तरुणाने काठी घेऊन प्रतिकार केला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये परदेशात एका दुकानामध्ये काम करणाऱ्या भारतीय तरूणाला मारहाण करत आहे. भारतीय तरूणाने प्रत्युतर करताच तरूण पळून जातानाचा हा व्हिडीओ आहे.

@MarioBabyFrmDaG या x हॅडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमेरिकेतील एका दुकानाबाहेर भारतीय तरूण शांत उभा असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान तेथे एक दुसरा व्यक्ती येताना दिसतोय. हा व्यक्ती काहीही न बोलता भारतीय तरूणाच्या कानाखाली मारत आहे. तरूण पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.

दोन ते तीन वेळा हा व्यक्ती तरूणाला मारतच आहे. जेव्हा हल्ला तीव्र होतो तेव्हा भारतीय तरूण दुकानात जातो तेव्हा ही व्यक्ती जिंकली असे गृहीत धरते आणि दारावर लाथा मारते. तेवढ्यात भारतीय तरूण काठी घेऊन त्याच्या मागे मारण्यासाठी धावताना दिसतो आहे. या तरूणाने का मारलं आहे याची माहिती नसून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत., "अशी घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यासाठी कठोर आणि निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरणे अत्यंत आवश्यक आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात धक्कादायक प्रकार! गॅस सिलेंडरमधून निघालं 10 लिटर पाणी

SCROLL FOR NEXT