Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Woman Kitchen Hacks: एका महिलेने जुना खराब कॅसरोल बॉक्स फेकून न देता त्याचा अनोख्या पद्धतीने वापर केला आहे. तिचा हा देसी जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून कौतुक मिळत आहे.
Published on

टाकाऊ पासून टिकाऊ हे तुम्ही ऐकलच असेल. महिला यामध्ये अग्रेसर असतात. अनेक जुगाड महिला या करत असतात. स्वयंपाकघरातील जुगाडाचा विचार केला तर महिला या सर्वांनाच मागे टाकतात. सोशल मीडियावर देखील असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका महिलेने खराब कॅसरोल बॉक्सचा वापर पुन्हा केला आहे. जे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

Viral Video
Viral News: कुटुंबासाठी पायलटने केलं नको कृत्य, कॉकपिटचा दरवाजा उघडला अन् प्रवाशांचा जीव घातला धोक्यात

सोशल मीडियावर महिलेचा देसी जुगाड व्हायरल होत आहे. चपाती ठेवण्याचा कॅसरोल बॉक्स खराब झाल्यानंतर या महिलेने तो फेकून देण्याऐवजी अनोख्या पद्धतीनं त्याचा वापर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिलेने चाकू गरम केला आहे. आता ती या गरम चाकूने कॅसरोल बॉक्स सर्व बाजूंनी कापते आहे. यानंतर ती त्याचे बाहेरचे प्लास्टिकचे आवरण काढून त्यातील स्टीलचा बॉक्स बाहेर काढते. जो स्वयंपाकघरात भाज्या ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर @Siimplymee1234 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हात जोडले आहे. महिलांच्या हातून कधीच काही रिकामे जाणार नाही असं देखील म्हटलं आहे. व्हिडीओवर व्हिडिओवर अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, 'भारतीय महिलांसाठी सर्वकाही शक्य आहे.' दुसऱ्याने म्हटले, 'भारतीय महिला प्रत्येक निरुपयोगी गोष्ट उपयुक्त बनवू शकतात.' तिसऱ्याने लिहिले, 'भारताची जुगाडू आई.' कोणीतरी म्हटले, 'काहीही वाया जाऊ नये.'

Viral Video
Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com