Pakistani Women Indian Boy Love Story: प्रेम हे आंधळं असतं, असं म्हटलं जातं. प्रेमात जात-पात वय तसेच धर्म बघितल्या जात नाही, प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात, असाच काहीचा प्रकार एका महिलेसोबत घडला. ४ मुलांची आई असलेल्या एका पाकिस्तानी महिलेचं भारतीय तरुणावर प्रेम जडलं. पब्जी खेळताना दोघांमध्ये मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
दोघांचाही प्रेमात (Love Story) इतका आकंठ बुडाला, की या महिलेने थेट ४ मुलांसोबत पाकिस्तान सोडत भारत-पाकिस्तानची सीमा देखील तिने पार केली. या तरुणीचे नाव सीमा असून यातील तरुणाचे नाव सचिन असे आहे. सीमा असं पाकिस्तानी महिलेचं नाव असून ती सचिन असं भारतीय तरुणाचं नाव आहे.
ग्रेटर नोएडा येथून ही हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. सीमा नेपाळमार्गे भारतात महिनापूर्वी आली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपर्यंत ती सचिनसोबत ग्रेटर नोएडा शहरात राहिली. भारतात (India) राहण्यासाठी लागणारे कोणतेही वैध कागदपत्रे सीमाकडे नव्हते. भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी सीमा सचिनसोबत लग्न करण्याच्या तयारीत होती, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गौतमबुद्ध नगर आयुक्तालय पोलिसांना या प्रेम कहाणीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सीमा आणि तिच्या चार मुलांसह प्रियकर सचिनला ताब्यात घेतलं आहे. पब्जी गेमवरून तरुणाला प्रेमप्रकरणात अडकवून या महिलेचा काही घातपाताचा कट तर नव्हता ना? याचा तपास पोलिस (Police) करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा आणि सचिन हे एकमेकांचे पब्जी गेममधील पार्टनर होते. गेम खेळता खेळता कधी प्रेम झालं हे त्यांना कळालं नाही. आता दोघांच्यामध्ये देशाची सीमा असल्याने भेट अशक्य होती. पण प्रेमासाठी सीमाने दोन देशांची सीमा ओलांडली. एवढंच नव्हे तर येताना ती आपल्या चार मुलांना घेऊन आली होती.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.