Ahmednagar News: वाह रे पठ्या! संगमनेरचा राहुल झाला चीनचा जावई; 'हद्द' ओलांडून बांधली लग्नगाठ

Sangamner Boy Married Chinese Girl: अहमदनगर जिल्ह्यातील एका पठ्ठ्याने प्रेमात 'हद्द' पार केली. संगमनेरमधील एका ग्रामीण भागातील तरुणाने चिनी मुलीसोबत लग्नगाठ बांधली.
Ahmednagar News Indian Hindu Boy Married Chinese Girl in Sangamner
Ahmednagar News Indian Hindu Boy Married Chinese Girl in SangamnerSaam TV

Sangamner Boy Married Chinese Girl: आजकाल लग्न म्हटलं की अनेक गोष्टी येतात. योग्य, मनासारखा जोडीदार शोधणं ही त्यात प्रामुख्याने येणारी गोष्ट. कधी जोडीदार ऑनलाइन शोधला जातो, कधी घरच्यांच्या ओळखीने. मात्र, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका पठ्ठ्याने थेट सीमा ओलांडून लग्नगाठ बांधली आहे.

संगमनेरमधील एका ग्रामीण भागातील तरुणाने थेट चिनी मुलीसोबत लग्नगाठ बांधली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राहुल हांडे (वय २९ वर्ष) असं या नवविवाहित तरुणाचं नाव असून शान छांग असं चिनी नवरीचं नाव आहे.

Ahmednagar News Indian Hindu Boy Married Chinese Girl in Sangamner
Nagpur Crime News: प्रेमविवाहाचा भयानक अंत! आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:ही घेतला गळफास; धक्कादायक कारण उघड

दोघांचाही विवाह संगमनेर (Sangamner News) तालुक्यातील घारगाव येथे हिंदू पद्धतीने मोठ्या थाटात पार पडला. संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावचा रहिवासी असलेला राहुल हांडे हा चीनमध्ये योग प्रशिक्षक म्हणून काम करतो.

घरची परिस्थिती बेताची असतानाही जिद्दीच्या जोरावर शिक्षण घेऊन त्याने योगाचे धडे गिरवले. योगाचे शिक्षण पूर्ण करून राहुलने चीनमध्ये योग केंद्र सुरू केले. या तरुणाची जिद्द आणि चिकाटी पाहून चिनी दाम्पत्याने त्याच्यासमोर मुलीच्या विवाहाचा (Marriage) प्रस्ताव ठेवला.

तो मान्य करताच राहुल हांडे आणि शान यांचा विवाह सोहळा हिंदू पद्धतीने संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मोठ्या थाटात पार पडला. महाराष्ट्राची संस्कृती बघून नवरी शान छांग देखील भारावून गेली होती.

Ahmednagar News Indian Hindu Boy Married Chinese Girl in Sangamner
Mumbai Crime News: ती लोकलची वाट पाहत उभी, तो दबक्या पावलांनी आला अन्... धक्कादायक VIDEO

राहुल याने शान छांग हिची गावातील मंडळी तसेच नातेवाईकांसोबत ओळख करून दिली. त्याचबरोबर राहुलने तिला महाराष्ट्रातील रूढी परंपरा देखील समजावून सांगितल्या. शान छांग सुद्धा आता मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असून लग्न सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना तिने मराठीत संवाद साधला.

शान छांगने 'कसे आहात' म्हणताच सर्वांनी तिला भरभरून दाद दिली. दरम्यान, राहुल हा नवविवाहित नवरीला घेऊन पुन्हा चीनला (China) रवाना होणार आहे. अजून काही वर्षे चीनमध्ये योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा पुन्हा भारतात येण्याचा मानस आहे. एका ग्रामीण भागातील तरूणाने चक्क चीनच्या मुलीशी लग्न केल्याने या विषयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com