Rohit Sharma Angry Saam Tv
व्हायरल न्यूज

IND vs AFG: रन आऊट होताच चढला रोहितचा पारा; धावेसाठी नो म्हणणाऱ्या गिलवर संतापला

Rohit Sharma Angry : रोहित शर्मा बऱ्याच दिवसांनी भारताकडून टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामन्यात आक्रमक खेळी त्याने केली होती. तीच अपेक्षा मनात ठेवून रोहितने फलंदाजीला सुरुवात केली, पण एकही धाव न करता त्याला माघारी परतावे लागले. यामुळे नेहमी कूल राहणारा रोहित शर्मा संतापला होता.

Bharat Jadhav

Rohit Sharma Angry On Shubman Gill:

आज अफगाणिस्तान आणि भारताच्या क्रिकेट संघात पहिला टी२० सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताने अफगाणितास्तानला पराभूत केलं. यामुळे खेळाडूंसह सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद आहे. परंतु भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल मात्र दुखी असेल. त्याचं कारण त्याला पडलेला कर्णधार रोहित शर्माचा ओरडा. (Latest News)

रोहित शर्मा बऱ्याच दिवसांनी भारताकडून टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामन्यात आक्रमक खेळी त्याने केली होती. तीच अपेक्षा मनात ठेवून रोहितने फलंदाजीला सुरुवात केली, पण एकही धाव न करता त्याला माघारी परतावे लागले. शुबमन गिलने धावेसाठी नकार दिल्याने रोहितला आपली विकेट गमावावी लागली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रथम फलंदाजी करतान अफगाणिस्तानच्या संघाने भारताला १५९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात आले. शुबमनने २३ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माला शुन्यावर माघारी परतावं लागलं. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शॉट खेळून रोहित धावा काढण्यासाठी धावला. परंतु रोहितने शुभमनकडे लक्ष दिले नाही.

शुबमन गिलने त्याला धाव घेण्यास नकार दिला. गिलचा इशारा समजेपर्यंत रोहित नॉनस्ट्राइक इंडला पोहोचला होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी संधीचा फायदा घेत स्ट्राईक एंडला रोहितला धावबाद केले. अशात रोहित शून्यावर धावबाद झाला. आऊट झाल्यानंतर रोहित शुबमन खूप रागावला होता. हातवारे करून शुभमनला अनेक गोष्टी ऐकवल्या असल्याचं दिसत आहे. दरम्यान रोहित बाद झाल्यानंतर शुभमनने काही काळ फलंदाजी केली. यानंतर तोही बाद झाला. १२चेंडूंचा सामना करत शुबमनने ५ चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या.

मोहालीत अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या. त्यासाठी मोहम्मद नबीने ४२ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान भारताकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT