Pasarni Village Viral Video: सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. जिथे अंत्यविधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने गावात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात सुमारे ३० ते ३५ लोक मधमाशांच्या चाव्यांचे बळी ठरले असून त्यांना तातडीने वाईतील खासगी हॉस्पिटल तसेच पसरणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पसरणी गावात घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावरही व्हायरल(Viral) होत आहे. अंत्यविधीच्या कार्यक्रमादरम्यान अचानक आजूबाजूच्या झाडांवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांमधून मधमाशा बाहेर आल्या आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर तुफान हल्ला चढवला. झालेला हल्ला इतका तीव्र होता की, काही क्षणांमध्येच अनेक लोक जखमी झाले आणि काहींची स्थिती चिंताजनक बनली.
अंत्यविधीसाठी झालेला मधमाशांचा हल्ला अनपेक्षित असल्यामुळे उपस्थित लोकांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही जण घटनास्थळावरून पटकन पळून गेले, तर काहींना इतके चावे बसले की ते जागेवरच कोसळले. यावेळी काही स्थानिकांनी तातडीने पोलिस आणि आरोग्य यंत्रणेला माहिती दिली.
सध्या सर्व घटना ही सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या(Instagram) saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यातमध्येच काहींना जीवही गमवावा लागला आहे.
टीप: सातारा जिल्ह्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.