UPSC Student Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'मोठा अधिकारी आला तर...'; UPSC परीक्षा उत्तीर्ण मुलाकडून वडिलांना हटके सरप्राईज, व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येईल

UPSC Student Viral Video: केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आहे. यापेक्षाही जास्त आनंद यूपीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आहे. यापेक्षाही जास्त आनंद यूपीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना झाला आहे. असाच आनंद क्षितीज गुरभेळेच्या वडिलांना झाला आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर क्षितीज गुरभेळेच्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत क्षितीज त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जातो. त्यावेळी त्याचे वडील ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत डबा खात होते. यावेळी क्षितीज अचानक ऑफिसमध्ये आल्याने क्षितीजच्या बाबांना काहीच समजत नाही. यानंतर क्षितीजचे बाबा त्याला म्हणतात, 'काय झाले?' त्यावर क्षितीज म्हणतो की, 'एखाद्या मोठा अधिकारी आल्यावर उठून उभे राहतात ना...' क्षितीजच्या वडिलांना काही वेळ समजलेच नाही. त्यानंतर वडिलांना समजले की, आपला मुलगा यूपीएससी पास झाला आहे. यानंतर क्षितीजचे वडिल त्याला घट्ट मीठी मारतात. याक्षणी त्यांच्या डोळ्यात मुलासाठी अभिमान आणि अश्रू असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणेल.

क्षितीज गुरभेलेने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर, 'अशा प्रकारे यूपीएससी २०२३ चा रिझल्ट मी माझ्या वडिलांना सांगितला. ते ऑफिसमध्ये जेवण करत असताना त्यांना ही गूड न्यूज दिली. मम्मी, पप्पा आणि दीदी माझ्यासाठी कायम उभे असतात. त्यासाठी तुमचे खूप आभार'. अस कॅप्शन दिले आहे.

क्षितीजच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी क्षितीजच्या कामगिरीचे खूप कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT