हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कृष्टी विद्यापीठाची जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी आंदोलन करत आहेत. त्याचदरम्यान पोलिसांनी एका विद्यार्थिनीचे केस ओढून तिला खाली पाडले आहे.याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)
प्राध्यापक जयशंकर तेलंगणा राज्य विद्यापीठाच्या कॅमप्समध्ये हे आंदोलन होत होते. उच्च न्यायलयाच्या बांधकामासाठी विद्यापीठाची जमीन देण्याचा विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचदरम्यान स्कूटीवरुन जाणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी एका विद्यार्थिंनीचे केस ओढले आणि तिला खाली पाडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओत एक विद्यार्थिनी पळताना दिसत आहे. तिच्या मागे दोन महिला पोलिस कर्मचारी स्कूटीवरुन जाताना दिसत आहे. तेव्हा स्कूटीवर मागे बसलेल्या एका पोलिसांनी त्या मुलीचे केस ओढले. त्यामुळे ती विद्यार्थिनी खाली पडते. त्यादरम्यान तिला इजा झाल्याचे दिसत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांना तर हा संपूर्ण प्रकार काय आहे हेच माहित नाहीये. अशा काही कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. तर अनेकांनी पोलिसांच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.