Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळला जिंवत उंदीर; विद्यापीठातील कँटिनमधील किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पुन्हा एकदा जेवणात जिंवत उंदीर आढळून आलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर खाद्यपदार्थां संबंधित बरेच खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हेच व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहून बाहेरील पदार्थ खावे की नाही असे प्रश्न उपस्थिक राहतात. मात्र पुन्हा एकदा अन्नपदार्थांसंबंधित एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका हैदराबादमधील एका विद्यापीठाच्या मेसमध्ये केल्या जाणाऱ्या चटणीत जींवत उंदीर आढळून आलेला आहे. सध्या सर्वत्र या घटनेने मोठी खळबळ उडाली असून व्हिडिओची नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल (Viral )असलेला हा प्रकार हैदराबादच्या सुलतानपूर येथील जवाहरलाल नेहरु टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या मेसमधील आहे. ज्या वेळेस या युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी मेसमध्ये जातात तेव्हा विद्यार्थ्यांना खाण्यास देण्यात येणाऱ्या चटणीमध्ये उंदीर पोहताना आढळला. चटणीमध्ये उंदीर दिसताच विद्यार्थ्यांना धक्का बसतो. सर्व धक्कादायक प्रकार त्याच युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये कैद केलाय.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी व्हिडिओ(Video ) सोशल मीडियावर शेअर केला असून तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @IndianTechGuide अकाउंटवर शेअर होत आहे. याआधी अन्नपदार्थांमध्ये विविध गोष्टी आढळून आलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहे. त्या व्हिडिओत कधी सांबारमध्ये मेलेला उंदीर तर कधी आइस्क्रीममध्ये मानवी बोट असे प्रकार समोर येत आहेत.

हैदराबाद येथे असणाऱ्या युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांकडूनही संतापजनक प्रतिक्रिया या धक्कादायक प्रकारावर येत आहेत त्यातील पहिला यूजर्संने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' विद्यार्थ्यांच्या जीवनाशी अशा प्रकारे खेळ केला जातोय, जिथे वसतिगृहे विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाण मानले जाते तिथेच असे प्रकार घडत आहेत,' तर आणखी एका यूजर्सने लिहिले आहे की,'या प्रकाराबद्दल लवकरात लवकर कारवाई (action)करण्यात यावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT