Police officer consoling the distressed man moments after preventing a life end following a domestic dispute Saam Tv
व्हायरल न्यूज

बायकोशी भांडून घरातून निघाला, पुलावर गेला अन्.....पुढे जे घडलं भयंकर;VIDEO

Wife Argument Issue: पत्नीशी झालेल्या भांडणानंतर नैराश्यात गेलेल्या पतीने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसाच्या सतर्कतेमुळे एक अनमोल जीव वाचला. या घटनेचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय.

Tanvi Pol

Uttar Pradesh News: जगण्याच्या या धावपळीच्या जीवनात नातेसंबंधांमध्ये बऱ्याचदा तणाव निर्माण होतो. कधी संवादाअभावी, तर कधी गैरसमजातून निर्माण झालेली दरी जीवघेणी ठरू शकते. सध्या अशीच एक घटना समोर आली असून, एका तरुणाने पत्नीशी झालेल्या भांडणानंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने एका सतर्क पोलिसाच्या हस्तक्षेपामुळे एक जीव वाचला आहे.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या आग्रामधील असल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणाची पत्नीशी(Wife) काही दिवसांपासून कुरबुरी सुरू होत्या. रोजच्या किरकोळ भांडणांमधून दोघांमध्ये तणाव वाढत गेला. मात्र, परिस्थिती इतकी बिघडली की, त्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात त्या तरुणाने घर सोडले.

तो थेट शहरातील एका उंच पुलावर गेला आणि तिथून उडी मारून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर तो पुलाच्या कठड्यावर उभा होता आणि काही क्षणांतच उडी मारणार, इतक्यात तिथून जात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला पाहिलं. तत्काळ त्याच्याजवळ धाव घेतली. अत्यंत संयमितपणे आणि शांतपणे त्यांनी त्या तरुणाशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यानंतर तरुणाला पकडून पुलावरुन बाजूला सारण्यात आले. सर्व थरार पुलावर आणि पुलाच्या खाली असलेल्या डोळ्यांच्या नागरिकांसमोर घडला.

परिसरात असलेल्या अनेकांनी सर्व प्रकार मोबाईलमध्येही कैद केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर काही तासांतच देशभरात वाऱ्याच्या वेगाने पसरला. सध्या हा व्हिडिओ(Video) एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @ShoneeKapoor या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर नेटकरी वर्गातून अनेक संतापजनक आणि हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

SCROLL FOR NEXT