CCTV footage captures the horrifying moment when a 1.5-year-old boy was fatally hit by a turning auto in Seoni district, Madhya Pradesh Saam Tv
व्हायरल न्यूज

क्षणात सगळं संपलं! घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकल्याला ऑटोने चिरडलं; घटना सीसीटीव्हीत कैद

MP Auto Accident: मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. घरासमोर खेळताना ऑटोने चिरडलं आणि तो जागीच ठार झाला. हा हृदयद्रावक क्षण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे केवळ दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी वेदनादायक आहे की ती ऐकून किंवा पाहून कुणाच्याही काळजाला चटका लागेल. चिमुकला आपल्या घरासमोर निरागसपणे खेळत असताना त्या परिसरातून वळण घेत असलेल्या ऑटोने त्याला चिरडले आणि तो जागीच ठार झाला. या अपघाताचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही तो झपाट्याने व्हायरल होत आहे.

ही दुर्दैवी घटना सिवनी जिल्ह्यातील एका रहिवासी भागात घडली. अपघाताच्या(Accident) वेळी लहान मुलगा आपल्या घराच्या अगदी बाहेर खेळत होता. आई-बाबा घरातच होते. काही क्षणांतच त्यांच्या आयुष्याचा आधार हिरावला जाईल, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.

मुलगा खेळत असतानाच गल्लीच्या एका टोकावरून एक ऑटो येत होता. तो वळणावर आला आणि अचानक वळण घेताना ऑटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने थेट चिमुकल्याला धडक दिली आणि त्याच्या अंगावरून ऑटो गेलं. हे दृश्य इतकं भयावह होतं की आजूबाजूचे लोक क्षणभर हादरून गेले. मुलाचा जागीच मृत्यू झाला. चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला.

सीसीटीव्हीमधील धक्कादायक दृश्य

या घटनेचा व्हिडीओ(Video) जवळच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. त्यामध्ये लहान मुलगा एकटाच खेळताना दिसतो आणि काही क्षणांतच ऑटो येऊन त्याला चिरडतो. चालक थांबत नाही आणि गाडी चालवत निघून जातो. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT