Uttar Pradesh News: पतीने भांडी घासायला सांगितल्यामुळे संतापलेल्या पत्नीने थेट पोलिस ठाण्याचा रस्ता धरला. तिचा आरोप होता की पतीने कामासाठी जबरदस्ती केल्यामुळे ती इन्स्टाग्रामवर तिचे दोन फॉलोअर्स कमी झाले. सोशल मीडियावर सध्या हा प्रकार वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशमधील पिलखुवा येथील सर्व प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. पिलखुवा परिसरात राहणाऱ्या तरुणीचे लग्न(Wedding) गौतमबुद्धनगर येथे राहणाऱ्या तरुणाशी झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि ती महिला नाराज होऊन माहेरी गेली. त्यानंतर त्याच महिलेने तिच्या पतीविरोद्धात तक्रार दाखल केली ज्यात तिने त्याच्यावर हुंडा आणि वारंवार त्रास देत असल्याचे आरोप लावले.
सर्व प्रकार महिला पोलिस ठाण्यात गेल्याने पोलिसांनी महिला आणि तिच्या नवऱ्याला काउंसलिंगसाठी बोलावले आणि त्यानंतर सर्व प्रकार ऐकून पोलिसही हैराण झाले. नवऱ्याचा तिच्या पत्नीवर आरोप होता की, ती दिवस-रात्र इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यात व्यस्त असायची. वेळेवर न जेवण बनवायची ना घरातील काम करायची. दुसरीकडे पत्नीने पतीवर राग व्यक्त करत म्हणाली, त्याने मला भांडी घासण्यासाठी पाठवले असता माझे फॉलोअर्स कमी झाले.
साधारण चार तास पोलिस ठाण्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. त्यानंतर पोलिस ठाण्यात पती-पत्नीमध्ये समजूत झाली आणि दोघांनी त्यांची चुक कबूल करण्याचा निर्णय घेतला. सध्या सोशल मीडियावर(Media) हा प्रकार चांगलाच चर्चेत आलेला असून नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे,''लग्नच नकोच बाबा'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''आता काय बोलाव आणि बोलं तरी आपण चुकीचं होऊ'' असा अनेक मजेशीर तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.