Railway Ticket Checker Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हिरो दिसणाऱ्या टीसीला पाहून पोरीचा जीव झाला येडापिसा, VIDEO

Railway Ticket Checker Viral Video: शताब्दी एक्सप्रेसमधील एका देखण्या टिसीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिकीट तपासण्याऐवजी हा टिसी मुलीचा क्रश बनला आहे.

Manasvi Choudhary

रेल्वेतून प्रवास करताना आपण सर्वजण तिकिट काढतो. तिकिट न काढता प्रवास केल्यास टिसीने पकडण्याची भिती असते. अनेकदा तिकीट नसल्यावर टीसी समोर दिसल्यास थरकाप उडतो. सर्वानाच भिती वाटते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चक्क टीसी एका मुलीचा क्रश बनला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

शताब्दी एक्सप्रेसमधील हा व्हिडीओ आहे. एका तिकिट तपासण्याऱ्या टीसीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक टिसी तिकिट तपासण्याची आपली भूमिका बजावत आहे. महिलांच्या डब्यात हा टिसी दिसत आहे. टीसी पाहून अनेकींना भिती वाटली नाही तर महिला त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. अत्यंत देखणा दिसणारा हा टिसी आवडला आहे.

दरम्यान एका युजरने ट्रेनमधील त्याचा तिकिट तपासतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओ शेअर करत एका युजरने, 'हाय, असा टीसी असेल तर मी रोज ट्रेनने प्रवास करेन' असं म्हटलं आहे. सोशल मिडिया इन्स्टाग्राम @foodwithepshi या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी टीसीच्या रूपाची प्रशंसा केली आहे. तर एका युजरने, 'तिकीट खिडकीतून फेकून द्या, मग तो तुम्हाला पकडून घेऊन जाईल' आणखी एकाने लिहले की, 'तो सरकारी नोकर आहे, त्याला खूप सुंदर बायको मिळेल, तुम्ही स्वप्न पाहू नका.'

तिकीट तपासणाऱ्या या साध्या टिसीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आता ट्रेनमधला टीसी मुलीचा क्रश बनला आहे. या मुलीने तिच्या मनातील गोष्ट सर्वासमोर सांगितली आहे यामुळे सध्या या देखण्या टीसी शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT