गुजरातमध्ये सध्या विविध ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. अशात नदी आणि तलावांमधील मगरी थेट मानवी वस्तीत आणि रस्त्यांवर फिरताना दिसतायत. आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तब्बल 15 फूट लांब आणि भली मोठी मगर मानवी वस्तीत आल्याचं दिसत आहे.
गुजरातच्या वडोदरा येथे ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मगर थेट फिरता फिरता रस्त्यावरून एका घराबाहेर येऊन थांबली. सकाळी नागरिक घरातून बाहेर पडण्यासाठी उठले त्यावेळी त्यांनी पाहिले की, भली मोठी मगर आपल्या घराबाहेर झोपली आहे. ही दृश्य पाहून तेथे उपस्थित सर्वांनाच धडकी भरली.
परिसरातील अन्य नागरिक देखील भयभीत झाले. त्यानंतर येथील वनरक्षक विभागाला मगर घराबाहेर आल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच वनरक्षक विभागातील कर्मचारी या व्यक्तीच्या घराबाहेर दाखल झाले. सुरुवातीला मगरीला पकडण्यासाठी त्यांनी दोरीचा फास बनवला. मगर आपल्यावर हल्ला करू नये म्हणून त्यांनी दोर मगरीच्या तोंडावर ठेवला.
त्यानंतर दोरीच्या सहाय्याने मगरीला पकडण्यात यश आले आहे. मगर पाडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागली. कारण आजुबाजूला सर्व व्यक्तींनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांच्या गोंधळामुळे मगर प्रचंड अॅग्रेसीव्ह झाली होती. अखेर अथक प्रयत्नानंतर मगर पकडण्यात व्यक्तींना यश आले आहे.
गुजरातच्या वडोदरा येथील फतेहगंज परिसरातील ही घटना आहे. सदर घटनेचा व्हिडीओ आहे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. या आधी देखील अशीच एक भलीमोठी मगर एका रस्त्यावर फिरताना दिसली होती.
मगर थेट रस्त्यावर का येत आहेत?
गुजरातमध्ये सध्या अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसात आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विश्वामित्रा नदीने देखील पाणीपातळी ओलांडली आहे. नदीला पूर आल्याने पुराच्या पाण्यात सर्व मगरी वाहून थेट मानवी वस्तीत येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.