Classroom Incident: सध्या सोशल मीडियावर एका सरकारी शाळेतील शिक्षिकेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की संबंधित शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी वर्गात संगीत ऐकण्यात आणि आरामात वेळ घालवण्यात मग्न आहे. स्पीकरवर मोठ्या आवाजात क्लासिकल म्युझिक वाजवत ती वर्गात बसलेली आहे आणि विद्यार्थीही काहीसे गोंधळलेल्या अवस्थेत बसलेले दिसतात. या प्रकारामुळे सरकारी शाळांमधील शैक्षणिक दर्जा आणि शिस्तीबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हा व्हायरल(Viral) व्हिडिओ एका सरकारी शाळेतील वर्गातला आहे, जिथे विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे. मात्र शिक्षिका तिच्या वैयक्तिक छंदात दंग असून शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतात. शिवाय त्यांच्या प्रत्येक कृतीचा प्रभाव थेट विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या भविष्यात होतो. मात्र, अशा वागणुकीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे आणि सरकारी शाळांची प्रतिमा मलीन होते आहे.
या व्हिडिओमध्ये दिसतं की वर्गात विद्यार्थी शिस्तबद्धपणे बसले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्टपणे दिसतो. शिक्षिका मात्र स्पीकरजवळ बसून ध्यान लावल्याप्रमाणे संगीत ऐकत आहे. हा प्रकार केवळ शिस्तभंग नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा अवमान आहे.
व्हिडिओ(Video) समोर आल्यावर पालक वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका यूजरने लिहिले आहे की,''आम्ही आमच्या मुलांना विश्वासाने शाळेत पाठवतो, पण जर शिक्षकच असं वागले तर आमचं मुलांचं भवितव्य काय?" तर अशा संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.