7 रुपयांचं कॉईन आता चलनात येणार आहे. आणि त्या कॉईनवर तुमच्या आवडत्या क्रिकेटरचा फोटोही असणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये तर तसा दावा करणारा मेसेज केला जातोय.त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात. महेंद्रसिंग धोनी...फक्त नावच काफी आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत. धोनी सगळ्यांनाच माहितीये.
क्रिकेटच्या मैदानात धोनी आला की अख्खं स्टेडियम धोनी धोनीच्या नावाने दणदणून जातं. तुमच्या याच आवडत्या धोनीला आता तुम्हीही घेऊन फिरू शकता. कारणही तसंच आहे. धोनीच्या नावाने 7 रुपयांचं कॉईन येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे कॉईन तुम्ही खिशात ठेवून फिरू शकता. मात्र, हे खरं आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. मात्र, आजही धोनी लोकप्रियता कमी झालेली नाही. सरकारही आता धोनीच्या नावानं 7 रुपयांचं नाणं आणतंय. ज्यावर त्याचा फोटो असेल. हा मेसेज आणि 7 रुपयांच्या नाण्याचे फोटो व्हायरल होतायत. त्यामुळे खरंच हे नाणं चलनात येतंय का? याची पडताळणी आम्ही सुरू केली. कारण, 7 चं कॉईन चलनातच नाहीये. त्यामुळे नवीन 7 रुपये चलनात येत आहे का? याची माहिती आरबीआयकडे मिळू शकते. आमच्या टीमने थेट आरबीआयशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
7 रुपयांच्या नाण्याचा फोटो खोटा
सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही
7 चं कॉईन आणण्याची भविष्यात योजना नाही.
7 रुपयांच्या नाण्याचा फोटो खोटा असून, आर्थिक व्यवहार विभागानं असं नाणं आणण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत धोनीच्या नावाने 7 चं कॉईन येणार हा दावा असत्य ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.