Saam Tv
व्हायरल न्यूज

भर रस्त्यावर घडला धक्कादायक प्रकार! गटाराच्या जाळीत अडकला महिलेचा पाय; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Woman's foot gets stuck in sewer: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा पाय गटाराच्या जाळीत अडकला आहे. पुढे काय घडले ते समजण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Mumbai Trending Video: मुंबई शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेचा पाय भर रस्त्यात गटाराच्या उघड्या जाळीत अडकला आणि ती मदतीसाठी ओरडत राहिली. ही घटना शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर घडल्याने नागरिकांनी धावपळ करत तिची सुटका केली. ही घटना शहरातील नागरी सुविधांच्या दुरवस्थेचे आणखी एक विदारक चित्र समोर आणत आहे.

नेमकी घटना कुठली?

व्हायरल(Viral) होत असलेली ही घटना मुंबई शहरातील गोरेगाव येथील असल्याचे समजत आहे. जिथे एक महिला बाजारासाठी बाहेर पडली होती. दरम्यान चालताना ती रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराच्या लोखंडी जाळीवर पाय ठेवताच तिचा पाय त्या जाळीत अडकला. स्वत:ला वाचवण्यासाठी महिला जोरजोरात ओरडू लागली पण तिचा पाय त्याच्यात अडकल्यामुळे तिला खुप वेदना होत होत्या.

या घटनेचा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे. जसे की, इन्स्टाग्राम, ट्वीटर (एक्स), फेसबूक. पण मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ primezewsmarath या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहण्यात आलेला आहे. साधारण एका दिवसांपूर्वी ही घटना घडली असल्याचे समजत असून आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज याला मिळाले आहेत.

सोशल मीडियावर याआधीही अशा विचित्र घटनांचे व्हिडिओ(Video) पाहण्यासाठी मिळाले आहेत. पण त्यावर प्रत्येक वेळी नागरिकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ही घटना पाहिल्यानंतर नागरिकांनी कमेंट्स दिल्या आहेत. त्यातील अनेकांनी म्हटलं,''बिचारी महिला किती तो त्रास सहन करावा लागला असेल'' तर अनेकांनी पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा संताप केला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन

Success Story: अपघाताने आयुष्यचं बदललं, मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; वैभव छाबरा यांचा प्रवास

Thursday Horoscope Update : मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल, वाचा आजचे राशीभविष्य

Budh Uday 2025: रक्षाबंधनच्या दिवसापासून 'या' राशींचं नशीब चमकणार; बुध ग्रहाचा उदय होऊन पैसाही मिळणार

Thursday Horoscope: सहा राशींचे उजळणार भाग्य; नोकरीत प्रमोशन अन् होणार धन लाभ

SCROLL FOR NEXT