Gold Bindi Sam TV
व्हायरल न्यूज

Gold Bindi: जाळ अन् धुर संगटच...; तरुणीनं लावली चक्क सोन्याची टिकली , डिझाइनचा VIDEO व्हायरल

Gold Bindi Jewelry: सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती आपल्या कपाळाला सोन्याची टिकली लावते आहे. सोन्याची ही टिकली चंद्रकोर आकाराची आहे.

Ruchika Jadhav

Sonyachi Tikli:

प्रत्येक स्त्रीला दागिने घालून मिरवायला फार आवडते. हातातल्या बांगड्या, पायात पैजण, कानातले, नाकात नथ, गळ्यात हार असे सर्वच सोन्याचे दागिने आपल्याकडे असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं. या सर्व दागिन्यांसह स्त्रीच्या चेहऱ्याची सोभा वाढवणारा आणि सौभाग्याचं लेन समजलं जाणारं कुंकू म्हणजेच टिकली देखील महिला आवडीने वापरतात.

सोन्याचे (Gold) विविध दागिने तुम्ही आतापर्यंत पाहिले आतील. मात्र भाळी लावली जाणारी सोन्याची टिकली तुम्ही कधी पाहिलीये का? नक्कीच अशी टिकली फार कुणाला माहिती नसेल. मात्र आता बाजारात स्त्रीची शोभा वाढवणारी टिकली देखील आली आहे. सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती आपल्या कपाळाला सोन्याची टिकली लावते आहे.

सोन्याची ही टिकली चंद्रकोर आकाराची आहे. या चंद्रकोरला खालच्या बाजूने घुंगरू आहेत. चंद्रकोरला आतल्या बाजूने गम लावून सोन्याची टिकली कपाळाला चीटकवली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत सोन्याचा झुमका, सोन्याची नथ ऐकलं होतं पण सोन्याची टिकली सुद्धा येते ... असं या पोस्टवर लिहिलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

@rv_makeover या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ (Video) पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही कितीही सोन्याची टिकली लावा पण कुंकवाची बरोबरी कशालाच नाही, ही टिकली कुठे पडली टिकली तर heart attack यायचा, पण टिकली ही लाल च छान दिसते, अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत. तर काहींनी आपला सोन्या पण तेवढाच गुणाचा हवा सोन्याची टिकली लावायला, अशी हस्यास्पद कमेंट देखील केली आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ८० हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT