Paragliding Video Saam TV
व्हायरल न्यूज

Paragliding Video: आजी बाईंची गगनभरारी! वयाच्या ८० व्या वर्षी केलं पॅराशूट राईड, VIDEO पाहून तरुणही लाजतील...

80 Years Old Grandmother Paragliding Viral Video: पॅराशूट राईडींग करताना त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती दिसत नाहीये.

Ruchika Jadhav

Paragliding Viral Video:

आजच्या तरुणाईमध्ये अॅडवेंचरचे क्रेझ दिसून येतेय. अनेक तरुण तरुणी आयुष्यात एकदा तरी पॅराशूट राईडींगचा आनंद घेतात. पॅराशूट राईडींग करण्यासाठी मोठी हिम्मत असणेही गरजेचे आहे. अॅडवेंचरमध्ये भलेभले पॅराशूट राईडींगपासून दूर पळतता. मात्र एका ८० वर्षांच्या आजींनी तरुणांना लाजवेल अशी करामत केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजी बाईंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ८० वर्षीय आजींनी साडी नेसून पॅराशूट राईडींग केलीये. पॅराशूट राईडींग करताना त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती दिसत नाहीये. अगदी बिनधास्त आणि आनंदाने त्यांनी ही गगनभरारी घेतली आहे.

@Indian Girls Travel 🇮🇳 (IGT) या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. २९ ऑक्टोबर रोजी या अकाउंटवर आजींचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडीओत दिसणाऱ्या आजी आता आपल्यात नाहीत. त्यांना जाऊन ७ वर्षांचा काळ लोटला आहे. अशी माहिती व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिली आहे.

आजी जेव्हा ८० वर्षांच्या होत्या तेव्हाही त्या फार उत्साही होत्या. आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि आव्हानात्मक करण्याचा त्या प्रयत्न करायच्या. त्यांच्या मुलीने हा व्हिडीओ पोस्ट करत आईची आठवण सर्वांसोबत शेअर केली आहे.

आतापर्यंत सोशल मीडियावर पॅराशूट राईडचे बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत. मात्र वृद्ध आजीबाई साडीनेसून पॅराशूट राईड करतायत हे पाहून नेटकरीही चकीत झालेत. आजी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणींचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sadabhau Khot: चमकोगिरीविरोधात शेतकऱ्यांचा संताप,सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांचा घेराव

Maharashtra Live News Update: वादळाच्या पार्श्वभुमीवर मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या बंदर विभागाच्या सुचना

कृषी मंत्री दत्तात्रय भरणें समोर शेतकऱ्याला हुंदका आला दाटून, पाहा VIDEO

Red Alert : पुढचे काही तास महत्त्वाचे! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', अतिजोरदार पाऊस कोसळणार

Pune Garba: भाजप खासदारानं गरबा बंद पाडला; ऐन कार्यक्रमावेळी खासदाराची धाड

SCROLL FOR NEXT