Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: पापा की परी झाली जलपरी; बोटीत बसायला गेली अन् धाडकन खाली कोसळली, हस्यास्पद VIDEO

Papa Ki Pari Video : ती समोर येते आणि बोटीच्या समोर असलेल्या प्लास्टिकवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यावर पाय ठेवून तिला बोटीत बसायचं असतं. आता एका पाय पायऱ्यांवर आणि दुसरा बोटीवर ठेवून ती चढण्याचा प्रयत्न करते.

Ruchika Jadhav

Girl Falls On Water :

सध्या सोशल मीडियावर पापा की परी हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. या टॅगवरून मुलींच्या करामातीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता देखील असाच एक हस्यास्पद व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी बोटीत बसण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी तिची चांगलीच फजिती झालीये.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तलावात काही बोटी उभ्या आहेत. यातील एका बोटीत तरुणीला बसायचे आहे. त्यामुळे ती समोर येते आणि बोटीसमोर असलेल्या प्लास्टिकवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यावर पाय ठेवून तिला बोटीत बसायचं असतं. आता एक पाय पायऱ्यांवर आणि दुसरा बोटीवर ठेवून ती चढण्याचा प्रयत्न करते.

तितक्यात बोट पुढे सरकू लागते. हात पकडून स्वतःला बॅलेंस करण्यासाठी तिच्याकडे काहीच पर्याय नसतो. त्यात बोट प्लास्टिकची असल्याने ती हळूहळू पुढे सरकते आणि खाली पडते. ती पाण्यात पडत असल्याची घटना तिच्या बरोबर असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. तसेच हा हस्यास्पद व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे.

खरंतर सोशल मीडियावर व्हायरल आणि हिट होण्यासाठी या तरुणीने व्हिडिओ काढण्यास सांगितलं असावं. मी बोटीत किती चलाखीने जाते हे तिला दाखवाचे असावे. मात्र तोल गेल्याने ती थेट पाण्यात पडली आहे आणि तिची भलतीच फजिती झाली आहे.

सोशल मीडियावर @gulzar_in या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शनमध्ये पापा की परी पाणी मे गिरी असं लिहिण्यात आलं आहे.

यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्यात. एक मछली पाणी मैं गई छपक छपक, पापा की परी काहीही करू शकते, ही तर पाण्याची चूक आहे. पाणी मुलीच्यामध्ये आलं अशा अनेक कमेंट करत यावर हसण्याचे ईमोजी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT