Ghaziabad Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Ghaziabad Viral Video: महिलेने पोलीस अधिकाऱ्याला चपलेने चोपलं; कारण काय? धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Woman Beaten Police: पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर महिलेसह ई-रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Ghaziabad Viral Video:

गाझियाबादमध्ये एका ई-रिक्षा चालक महिलेने पोलीस उपनिरीक्षकाला भररस्त्यात मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेने पोलिसाची कॉलर पकडून चप्पलेने बेदम चोप दिला आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर महिलेसह ई-रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. (Latest Marathi News)

इंदिरापुर पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ९ येथे असलेल्या कानवानी-पुस्ता रोडवर ही घटना घडली. महिला आणि पोलिसात वाद सुरू असताना अनेकांनी तेथे घोळका केला होता. त्यातील काहींनी घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, महिला सारखी पोलिसाच्या अंगावर धावून जात आहे. मारहाण सुरू असताना तू येथून निघून जा असं पोलीस तिला म्हणत आहेत. मात्र ही महिला जराही ऐकण्यास तयार नाही. महिलेने पोलिसाला बेदम चपलेने चोप दिलाय.

महिलेने असं का केलं?

इंदिरापुरम क्षेत्राचे वाहतूक निरीक्षक योगेश पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-रिक्षा चालक महिला कानवणी-पुस्ता रस्ता येथे प्रवासी भाडे घेण्यासाठी उभी होती. हा रस्त अरूंद असल्याने तिला रिक्षा दुसरीकडे लावण्यास सांगितले. रस्ता अरुंद असल्याने यावर नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नाही, तसेच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महिलेला असं सांगण्यात अलं होतं.

मात्र महिलेन पोलिसाचे म्हणणे न ऐकता ऑन ड्यूटीवर असताना पोलिसांवर हात उगारला. भररस्त्यात त्यांना चपलेने मारहाण केली. ही घटना घडत असताना इतर कोणतीही व्यक्ती मध्ये पडली नाही. कोणीही मदतीसाठी किंवा भांडण थांबवण्यासाठी मध्ये पडले नाही. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT