Garba Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Garba Viral Video: आईचा स्वॅगच भारी! २ वर्षाच्या लेकराला पाठीवर घेऊन खेळला गरबा; VIDEO व्हायरल

Mother Dance With Small Baby On Garba: सोशल मीडियावर सध्या गरबा खेळतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक महिला आपल्या बाळाला पाठीवर घेऊन गरबा खेळताना दिसत आहे.

Siddhi Hande

नवरात्र सुरु आहे. नवरात्री रोज रात्री गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गरबा खेळायला जातात. वर्षातून नवरात्रीचे ९ दिवस मोठ्या उत्साहात गरबा खेळता येतो. त्यामुळे अनेकांना त्याचा मोह आवरत नाही. आवड जोपासण्यासाठी अनेकजण काहीही करतात. असंच काहीसं एका महिलेने केलं आहे. एका महिलेने चक्क मुलाला पाठीवर बांधून गरबा खेळला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक महिला आपल्या लहान बाळाला पाठीवर घेऊन गरबा खेळताना दिसत आहे. महिला गोल राउंडमध्ये सर्वांसोबत गरबा खेळत आहे. यामध्ये महिलेच्या पाठीवर एक लहान बाळ आहे. लहान बाळाला पाठीवर घेऊनदेखील या महिलेचा उत्साह काही कमी होताना दिसत नाहीये. महिला छान स्टेप करत गरबा खेळताना दिसत आहे. आजूबाजूच्या महिलांसोबत स्टेप्स करत डान्स करत आहे. मागे पाठीवर बांधलेल्या बाळालादेखील याचा काही प्रॉब्लेम होत नाहीये.हे बाळदेखील गरब्याचा आनंद घेताना दिसत आहे.

rushi_dokhe_5494 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर 'एक होती झाशीची राणी जी पाठीवर बाळ घेऊन रणांगण लढविणारी आणि आजची नारी जी पाठीवर बाळ घेऊन दांडिया खेळणारी'असं कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओव नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओत महिला मोठ्या उत्साहाने गरबा खेळताना दिसत आहेत. वेगवेगळ्या स्टेप्स करताना दिसत आहे. अनेक लहान मुलीदेखील या मोठ्या मुलीना पाहून डान्स करताना दिसत आहेत. त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

SCROLL FOR NEXT