Grandmothers dance on ashi chik motyanchi maal marathi song Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Video Viral: गणपतीचा उत्साह! 'अशी चिक मोत्यांची माळ' गाण्यावर आजींनी केलाय डान्स, Video व्हायरल

Grandmothers Dance on Ganpati Song: गणेशोत्सवाच्या उत्साहात आजींनी पारंपरिक साडी परिधान करून 'अशी चिक मोत्यांची माळ' गाण्यावर धमाल डान्स केला. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. काल म्हणजेच २७ ऑगस्ट २०२५ रोजी लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशे, लेझीम, गाणी, डान्स कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये 'अशी चिक मोत्यांची माळ' या गाण्यावरील आजींचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे. आजींच्या ग्रुपने खास डान्स केला आहे.

सोशल मीडियावर प्रत्येक ट्रेंडनुसार वेगवेगळी गाणी व्हायरल होतात. सध्या गणपतीचा उत्साह आहे. गणपती उत्साहातील अशी चिक मोत्यांची माळ हे गाणं सध्या ट्रेंड करत आहे. या गाण्यावर अनेकजण रिल्स बनवताना दिसत आहेत. खास वयोवृद्ध आजींच्या ग्रुपने डान्स केला आहे जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजींनी खान डान्स केला आहे. आपली मराठी संस्कृती जपत त्यांनी मराठमोळ्यावर गाण्यावर डान्स केला आहे. पारंपारिक साडी त्यांनी परिधान केली आहे. सेम हुकस्टेप करत या सर्व आजींनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. नऊ जणींच्या हा ग्रुप डान्स पाहून तरूणांईही देखील फिकी पडेल.

सोशल मीडियावर @shantai_second_childhood या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. नऊ आजींनी मिळून केलेला हा डान्स खरचं कौतुकास्पद आहे. सेम स्टेपमध्ये या आजी नृत्य करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. तर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

Maharashtra Live News Update: उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानींचा आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

Mithila Palkar: मिथिला पालकरच्या सौंदर्याची जादू, साडीतील फोटोंनी केले घायाळ

SCROLL FOR NEXT