Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

Funny Video: सोशल मीडियावर सध्या एका कुटुंबातील काही व्यक्तीचा गंमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Uttar Pradesh Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला दरवेळी अतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग कधी शाळेतील चिमुकल्यांचे व्हिडिओ असतात तर कधी हटके जुगाड केलेल्या व्यक्तीचे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ उत्तर प्रदेशमधून समोर आलेला आहे. ज्यात कुटुंबातील तब्बल ८ जणांना यात्रेत फिरवण्यासाठी एक व्यक्त एकाच बाईकवरुन घेऊन जात आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक बाईकस्वार दिसत आहे आणि तो पोलिसांची बोलताना दिसत आहे, मात्र बाईकस्वाराच्याठीमागे पाहिले असता तब्बल ५ जण आणि बाईकच्या(Bike) टाकीवर तीन लहान चिमुकली बसलेली दिसत आहे. बाईकवर तब्बल ८ जण बसलेली आहेत आणि त्यांना पाहून पोलिसांनी त्या बाईकस्वाराला थांबवले आणि विचारले असता तो जत्रा पाहण्यासाठी कुटुंबियांना घेऊन जात आहे. सर्व प्रकार तेथिल एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

उत्तर प्रदेशमधील व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@UPNBT'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''शाहजहांपूर : मिर्झापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवर आठ जण बसलेले पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले. संपूर्ण कुटुंब दुचाकीवरून जत्रा पाहण्यासाठी बाहेर पडले होते'' असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कुणालाही पटवायची गरज नाही, लोक त्यांना जे आवडतात तेच करतात'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''वाढत्या महागाईमुळे असू शकते'' शिवाय अजून एका यूजरने लिहिले आहे की,''पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे'',अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT