Clever Crow Viral Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Clever Crow Viral Video : लहानपणीच्या गोष्टीतील चतुर कावळा सापडला..VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video: लहानपणापासून आपण अनेक पंचतांत्रील कथा तसंच गोष्टी ऐकत मोठे झालो. त्या गोष्टीतील विविध पात्र आपल्या आयुष्यातील भाग बनले गेले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Clever Crow Viral Video

लहानपणापासून आपण अनेक पंचतांत्रील कथा तसंच गोष्टी ऐकत मोठे झालो. त्या गोष्टीतील विविध पात्र आपल्या आयुष्यातील भाग बनले गेले. पंचतंत्र सोडून अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ज्या आजपर्यंत कधीच काळाच्या ओघात कोणीही विसरले नाहीत. त्यातील एक लहानांपासून ते मोठ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे..चतूर कावळ्याची.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहानपणी आपण तहानलेल्या कावळ्याची अनेकदा गोष्ट ऐकली असेल. कावळ्याला तहान लागते आणि तो पाण्याच्या शोधात असतो ,तर एका भांड्यात त्याला पाणी सापडते आणि त्याची पातळी कमी असते म्हणून तो त्याच्यात दगड टाकतो आणि पाण्याची पातळी वाढते आणि मग तो पाणी पिऊन आपली तहान भागवतो अशी त्या चतूर कावळ्याची गोष्ट आहे. याच गोष्टीतील कावळा पुन्हा एकदा आपल्याला दिसून आला आहे. पण आता तो पाणी पिताना दिसला नाही तर तो अशाच प्रकारच्या गोष्टीमध्ये स्वत:चे चातुर्य दाखवत आहे. सोशल मीडियावर या चतूर कावळ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नक्की काय आहे या व्हिडिओत पाहूयात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी एका महिलेच्या बाजूला कावळा हा आपल्याला दिसतोय. त्यानंतर तो त्याच्या जवळचे लहान लहान कप व्यवस्थित एकापाठोपाठ एक एकमेकांत लावत आहे. आपल्या बारीक अशा चोचीने हे काम तो करतोय. कोणता कप कधी लावला पाहिजे हे कावळ्याला योग्यपणे समजते. हे काम झाल्यानंतर याचे बक्षिस म्हणून ती महिला त्याला खाण्यासाठी काही दाणे देताना आपल्याला व्हिडिओत दिसतेय.

व्हायरल व्हिडिओ हा @buitengebieden या ट्वीटर अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ हा तिथं असलेल्या व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे समजले नाही. मात्र एक नक्की हा व्हिडीओ पाहून अनेकांना लहानपणी सांगण्यात आलेली गोष्ट आठवली असेल.

सदर व्हिडिओवर कमेंटसचा वर्षांव होत आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी कावळ्याची हुशारी पाहून त्याचं कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT