Digital Detox : डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ? यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते का? तर या गोष्टी टाळाच

How do you detox digital life : तुम्ही दर आठवड्याला सोशल मीडियापासून ब्रेक घेतला तर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आपण निरोगी राहू शकतो.
Digital Detox
Digital DetoxSaam Tv
Published On

What Is Digital Detox : सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वचजण घड्याळ्याच्या काट्यावर चालतात आणि खूपच थकून जातात. त्यामुळे डोक्यावर असलेला कामाचा व्याप हा तणावाकडे वळतो, ही जागतिक समस्या बनली आहे. जी अनेक आजारांना निमंत्रण देते.

तणावामुळे आरोग्यावर (Health) गंभीर परिणाम होतात, त्यामुळे तुम्हाला थकवा, स्नायूं दुखणे, छातीत दुखणे, लैंगिक आरोग्यावरील दुष्परिणाम, लक्ष न लागणे, भूक न लागणे, राग येणे, चिडचिड होणे असे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. तणावामुळे मानवी आरोग्यावर अनेक घातक परिणाम होऊन बरेचजण आजाराला बळी पडतात. त्यापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहून आरोग्या जपायला हवे ते सांगितले आहेत.

Digital Detox
Mumbai's First Digital Bus Stop : मुंबईतील पहिले डिजिटल बस स्टॉप ! आता सुरक्षित प्रवासासह वाचनाचीही सुविधा, जाणून घ्या कुठे आहे ?

आलिया भट्टच्या नुकत्याच झालेल्या मुलाखातीत तिने सांगितले की ती आठवड्यातून दोन किंवा एक दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घेऊन जीवनातल्या वास्तविक गोष्टींचा आनंद घेते आणि उरलेल्या वेळचा उपयोग करते. आलिया म्हणते सोशल मीडियाचे वेड असणे चांगले नाही त्यापेक्षा आकाशाकडे एकटक पाहा आणि स्माईल करा. चला तर मग आलियाचा हा साप्ताहिक डिजिटल डिटॉक्स काय आहे? आणि त्याचे महत्त्व काय? ते जाणून घेऊया.

आपल्या दैनंदिन जीवनात सतत मोबाइल (Mobile), टिव्ही, लॅपटॉप अशा डिवाइस आपण वापरतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांना स्क्रीनचा संपर्क कायम होतो आणि मानसिक थकवा येऊ शकतो, तणावाची पातळी वाढते आणि यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. आपण दर आठवड्याला सोशल मीडियापासून ब्रेक घेतला तर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आपण निरोगी राहू शकतो. डिजिटल डिटॉक्स केल्याने मानसिक आराम, टवटवीत, एनरजेटीक होऊ शकते.

Digital Detox
Digital Donation In Temples: आता मंदिरातही करता येणार डिजिटल दान...जाणून घ्या

सतत स्क्रोलिंग किंवा स्वाइप केल्याने व्यसनाधीन आणि धोकादायक प्रभाव मेंदूच्या डोपामाइनवर पडतो. म्हणून या सर्व गॅजेटपासून 24-48 तासांचा ब्रेक हवा. तुमचे महत्त्वाचे कॉल आणि मॅसेज वगळता तुम्ही आरोग्यादायी जीवनासाठी हे करणे गरजेचे आहे. थेरपिस्ट आणि योगसाधक अनन्या दास असे म्हणतात की, साप्ताहीक डिजिटल डिटॉक्समुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात कार्यक्षमता वाढवण्याचे काम करते.

फोनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे आपल्या मेंदूला रात्रीही दिवस असल्याचा भास होतो. स्मार्टफोन आणि सोशल मीडिया अ‍ॅप्सवरील काही अभ्यासांतून असं दिसून आलंय की, तंत्रज्ञान कंपन्या बिहेवियर सायकोलॉजीवर काम करतात. ज्यामुळे लोकांना स्मार्टफोन आणि अ‍ॅप्स अधिक वापरण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. बऱ्याच जणांना फोनची इतकी सवय असते की ते पाच मिनिटंही फोन लांब ठेवत नाहीत. पण सोशल मीडिया आणि स्मार्टफोनची वाढती सवय तुम्ही ठरवल्यास कमी करू शकता. यासाठी तुम्हाला डिजिटल डिटॉक्स सुरू केले पाहिजे.

Digital Detox
Detox Water: फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर आरोग्याच्या इतर गोष्टींसाठी फायदेशीर आहे डिटॉक्स वॉटर

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ?

डिजिटल डिटॉक्स (Detox) ही अलीकडच्या काळात उदयास आलेली संकल्पना आहे. मोबाईल, कम्प्युटर, आयपॅड यासारख्या गॅजेट्सच्या अति वापराच्या सवयीमुळे माणसाचा आसपासच्या जगाशी तुटलेला संपर्क, त्यामुळे निर्माण होणारे मानसिक असंतुलन अशा अनेक कारणांमुळे डिजिटल डिटॉक्स या संकल्पनेची गरज भासू लागली. डिजिटल डिटॉक्स म्हणजे अशा या काल्पनिक जगा मधून बाहेर पडून वास्तविक जगाचं महत्व समजून घेणे.

  • थेरपिस्ट आणि योग अभ्यासक अनन्या दास यांच्या मते डिजिटल डिटॉक्स करताना सर्व डिजिटल उपकरणांने स्वत: पासून दूर ठेवा. उपकरणांना अशा जागी ठेवा ज्या जागेवर गेल्यावर तुम्ही मोहात पडणार नाही. तसेच तुमच्या मोबाइलच्या अलार्म क्लॉक ऐवजी फिजिकल अलार्म क्लॉकचा वापर करा.

  • डिजिटल मार्केटिंग व्यावसायिक सरांश तिवारी यांच्यामते तुमचा स्क्रीन टाइम तुम्ही टाळलात तर तुमच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम करण्याऐवजी काहीतरी शिकण्यास मदत करेल. त्यामुळे, तुमचा स्क्रीन वेळ मर्यादित करणे आणि अधिक वास्तविक जीवनातील अनुभव घेणे केव्हाही चांगले आहे.

  • एरिक्सन कन्झ्युमरलॅबच्या अहवालानुसार भारतातील स्मार्टफोन वापरकर्ते त्यांच्या मोबाइलवर दररोज किमान 92 मिनिटे व्हिडिओ पाहण्यात आणि सुमारे 89 मिनिटे इंटरनेट ब्राउझ करण्यात घालवतात.

Digital Detox
Digital Marketing Career : डिजिटल क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी, हे कोर्स करा मिळेल लाखोंचा पगार

साप्ताहिक डिजिटल डिटॉक्स कसे करावे?

  • तुम्हाला साप्ताहिक डिजिटल डिटॉक्स करण्याची आवश्यकता का भासते हे जाणून घ्या.

  • तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना कळवा की तुम्ही त्या काळात उपलब्ध नसाल.

  • तुमच्या डिटॉक्ससाठी टाइम फ्रेम निश्चित करा. तो पूर्ण दिवस, शनिवार व रविवार किंवा दररोज काही नियुक्त तास असू शकतो.

  • तुमच्या डिजिटल डिटॉक्स वेळेचा उपयोग अशा नविन अॅक्टिवीटीजमध्ये गुंतण्यासाठी करा जे तुम्हाला आनंद आणि विश्रांती देतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com