A still from the viral video showing the moment a passenger was caught trying to steal a life jacket during a flight Saam Tv
व्हायरल न्यूज

विमान प्रवासात मर्यादा ओलांडली; प्रवाशाच्या अश्लील कृत्याने सहप्रवासी संतप्त

Stealing Life Jacket On Flight: एका प्रवाशाने विमानातून लाइफ जॅकेट चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र एका सतर्क प्रवाशाने त्याला रंगेहाथ पकडले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Viral Flight Video: आकाशात उड्डाण करत असताना प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित प्रवासाची अपेक्षा असते.पण, विमानातच जर कोणी नियमांचं उल्लंघन करत असेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण प्रवासावर होऊ शकतो. अशीच एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना नुकतीच घडली असून, एका प्रवाशाने विमानातील 'लाइफ जॅकेट' चक्क चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी एका सतर्क प्रवाशाच्या लक्षात आल्याने चोराला रंगेहाथ पकडण्यात यश आलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमके घडले काय?

ही घटना एका देशांतर्गत प्रवासादरम्यान घडली. प्रवास(Travel) सुरू होण्याआधीच एका प्रवाशाने आपल्या खालील सीटखालून असलेल्या आपत्कालीन सुरक्षेसाठी ठेवलेल्या लाइफ जॅकेटवर डोळा ठेवला. त्यानंतरच काही वेळातच त्याने ते जॅकेट हळूच काढून आपल्या बॅगेत ठेवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं इतक्या चतुराईने करण्यात आलं होतं की इतर प्रवाशांच्या लक्षातही आलं नसतं, पण सुदैवाने एका सतर्क प्रवाशाने हा प्रकार पाहिला आणि त्याने तात्काळ विमान कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ(Video) त्याच विमानातील एका प्रवाशाने शूट केला होता. त्यात संबंधित चोरट्याला कर्मचाऱ्यांकडून जाब विचारताना आणि त्याने चोरलेलं जॅकेट काढून देताना स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. ''विमानात सुरक्षिततेशी खेळणं म्हणजे संपूर्ण प्रवाशांच्या जिवाशी खेळणं,'' अशा शब्दांत अनेकांनी व्यक्तीवर टीका केलेली आहे.

लाइफ जॅकेट चोरी का गंभीर आहे?

लाइफ जॅकेट हे प्रत्येक प्रवाशाच्या सीटखाली ठेवलेलं एक महत्त्वाचं सुरक्षा उपकरण असतं. विमानात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा वापर करून जीव वाचवता येतो. जर हे उपकरण आधीच चोरीला गेलं असेल तर संबंधित प्रवाशाचाच नव्हे तर इतरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई होणं आवश्यक ठरतं

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT